अभिधम्मपिटक
अभिधम्मपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकाचा एक भाग आहे. सुत्तपिटकातील विषय प्रश्नोत्तराच्या रुपाने दिले आहेत. सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक या दोन्ही ग्रंथाचे विषय एकच आहेत. या दोन ग्रंथात फरक इतकाच आहे की, अभिधम्मपिटकातील ग्रंथाची माहिती अधिक सविस्तर, रुक्ष व पांडित्यपूर्ण आहे. अभिधम्म म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा धर्माची श्रेष्ठ तत्वे होत. अभिधम्मपिटकात एकंदर सात ग्रंथ मोडतात.
अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे.
१. धम्मसंगणि
२. विभंग
३. धातुकथा
४. पुग्गलपञती
५. कथावत्थु
६. यमक
७. पट्ठान