Get it on Google Play
Download on the App Store

सुत्तपिटक

सुत्तपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकाचा एक भाग आहे. 'सुत्त' या शब्दाचा अर्थ उपदेशपर वाक्य किंवा प्रवचन होय. यात धर्माविषयीच्या उपदेशांचा संग्रह करण्यात आलेला आहे. याचे पाच निकाय (संग्रह) आहेत.

२. सुत्तपिटक : सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.
(अ) दिघ निकाय - ३४ सुत्त,
(ब) मज्झिम निकाय - १५२ सुत्त
(क) संयुत्त निकाय - ७७६२ सुत्त
(ड) अंगुत्तर निकाय - ९५५७ सुत्त
(इ) खुद्दक निकाय - खुद्दक निकायामध्ये इतर निकायांप्रमाणे सुत्तांऐवजी १५ ग्रंथांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे :

१. खुद्दकपाठ
२. धम्मपद
३. उदान
४. इत्थिवत्थु
५. सुत्तनिपात
६. विमानवत्थु
७. पेतवत्थु
८. थेरगाथा
९. थेरीगाथा
१०. जातक
११. अपदान
१२. निद्देस
१३. पटिसंभिदामग्ग
१४. बुद्धवंश
१५. चरियापिटक

त्रिपिटक

धर्मानंद कोसंबी
Chapters
त्रिपिटक विनयपिटक सुत्तपिटक अभिधम्मपिटक