अभंग २१ ते २४
२१) वडील तूं बंधु असोनी अविचार । केला कां निर्धार सांग मज ॥१॥
न पुसतां कां बा आलासि धांवत । वहिनी आकांत करतील कीं ॥२॥
येरू मह्णे विठु पुरविल सामोग्री । भार तयावरी घातिलासे ॥३॥
निर्मळा म्हणे ही बरी नोहे गोष्टी । विठोबासी कष्टी करणें काज ॥४॥
२२) संसाराचे भय घेवोनी मानसीं । चोखा मेहुणपुरीसी जाता झाला ॥१॥
देखोनी निर्मळा आनंदली मनीं । धांवोनी चरणीं मिठी घाली ॥२॥
बैसोनी शेजारी पुसे सुखमात । वहिनीं क्षेमवंत आहेत कीं ॥३॥
निर्मळा म्हणे पुढील विचार । कैसा तो साचार सांगे मज ॥४॥
२३) संसाराचे कोण कोड । नाहीं मज त्याची चाड ॥१॥
एका नामेंचि विश्वास । दृढ घालोनियां कांस ॥२॥
जेथें न चले काळसत्ता । विठोबाचें नाम गातां ॥३॥
शास्त्रें पुराणें वदती । नाम तारक म्हणती ॥४॥
विर्मळा म्हणे नामसार । वेदशास्त्रांचा निर्धार ॥५॥
२४) सुख अणुमात्र नाहीं संसारी । सदां हावभारी रात्रंदिवस ॥१॥
न घडे न घडे नामाचें चिंतन । संताचेम पूजन न घडेचि ॥२॥
न बैसे मन एके ठायीं निश्चळ । सदा तळमळ अहोरात्र ॥३॥
निर्मळा म्हणे चोखिया सुजाणा । पंढरीचा राणा जीवीं घरी ॥४॥