अभंग १ ते ५
१) अनाथांचा नाथ कृपावंत देवा । घडो तुमची सेवा अहर्निशीं ॥१॥
अठ्ठाविस युगें विटेवरी उभा । वामभागीं शोभा रुक्मादेवी ॥२॥
पतित पावन गाजे ब्रीदावळी । पुरवावी आळी हीच माझी ॥३॥
उभा विटेवरी ठेवोनी चरण । म्हणतसे बहिण चोखियाची ॥४॥
२) अनंता जन्मांचे सुकृत पदरीं । तोचि उच्चारी होठी हरिनाम ॥१॥
अनंता जन्माचें पुण्य जयागांठी । तोचि उच्चारी होठी हरिनामा ॥२॥
अनंता जन्मांचे तपादि साधन । तोचि नारायण जपे नाम ॥३॥
अनंता जन्मांची सोडियेली जोडी । तरीच लागे गोडी हरिनामीं ॥४॥
निर्मळा म्हणे अनंता जन्माचें । उच्चारतां वाचे पाप जाय ॥५॥
३) आजिवरी तुम्हीं तयासीं पाळिलें । अपराध साहिले चोखियाचे ॥१॥
तयाचिया पाठी आमुचा कंटाळा । आला कां दयाळा सांगा मज ॥२॥
हीन दीन मी पातकांची राशी । शरण पायांसी जीवें भावें ॥३॥
निर्मळा म्हणे तुम्ही तो दयाळ । म्हणोनी सांभाळ करा माझा ॥४॥
४) आतां बहु बोलणें सारोनियां ठेवा । उगवा हा गोंवा मायबापा ॥१॥
संसाराचा छंद नकोसा हा झाला । परमार्थ भला संतांसंगें ॥२॥
जें आहे कडु तें तें लागे गोडू । गोडाचे जें गोडू तें लागे कडु ॥३॥
निर्मळा म्हणे सुख तुमचे पायीं । आणिक मी कांही नेणें दुजें ॥४॥
५) आनंदें वोविया तुम्हासी गाईन । जीवें भावें वोवाळीन पायांवरी ॥१॥
सुकुमार साजिरीं पाउलें गोजिरीं । ते हे मिरवली विटेवरी ॥२॥
कटावरी कर धरोनी श्रीहरी । उभा भीमातीरी पंढरीये ॥३॥
महाद्वारीं चोखा तयाची बहिण । घाली लोटांगण उभयतां ॥४॥