मी मृत्युलाही घाबरत नाही
एका शिल्पकाराला साधूने भविष्य सांगितले.
'तुझा मृत्यु जवळ आला आहे.
१५ दिवसांनी यमदूत तुला घ्यायला येईल.
साधूची ही भविष्यवाणी ऐकून शिल्पकार घाबरला.मृत्युपासून वाचण्याची युक्ती तो शोधू लागला.अचानक त्याला कल्पना सुचली,त्याप्रमाणे त्याने हुबेहुब स्वत:च्या चार प्रतिमा तयार केल्या.अगदी जिवंत वाटाव्यात अशा! तोही त्या मूर्त्यांच्या बाजूला जाऊन उभा राहिला.पंधराव्या दिवशी यमदूत शिल्पकाराला न्यायला आला. पाहतो तो काय? पाच शिल्पकार अगदी सारखे दिसणारे समोर उभे!
यातला खरा शोधायचा कसा?
तो गोंधळला.यमदूत तसाच यमराजाकडे गेला.यमदूताची हकिगत ऐकून यमराज स्वत:च खाली आला.समोरच्या पाच मूर्ती पाहून तोही थक्क झाला.
त्या अप्रतिम कलेची तोंड भरून स्तुती करू लागला.यमराज म्हणाला.....!
"मूर्ती घडवणारा खरोखरच प्रतिभावंत आहे.
अशा अप्रतिम मूर्ती मी प्रथमच पाहातो आहे. पण ह्या मूर्ती घडवणारा शिल्पकार आहे तरी कोण?"
अनाहूतपणे पाच शिल्पातलं एक शिल्प पुढे सरकत अभिमानाने म्हणालं.....!
_ "मी या मूर्ती घडवल्या." यमराजाने त्या शिल्पकाराचा तत्काळ ताबा घेतला!
अहंकाराने शिल्पकार मृत्युच्या दारात गेला.
पहा काय गंमत आहे!
मृत्यु समोर आला तरी, माणसाचा अहंकार, 'मी'पणा काही मरत नाही!