विजयादशमी आणि दसरा
विजयादशमी आणि दसरा ह्या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी नसू शकतात. अनेकदा आधल्या दिवशी विजयादशमी असते आणि दुसऱ्या दिवशी दसरा. २०१८ साली मुंबईच्या स्थानिक पंचांगानुसार नवरात्रातील द्वितीयेचा क्षय झाल्याने नवरात्र आठ दिवसांचे होणार होते, परंतु नवमीची वृद्धी झाल्याने नवरात्र पूर्ववत् नऊ दिवसांचे झाले. १७ आणि १८ आॅक्टोबर या दोनही दिवशी सूर्योदयसमयी नवमी होती, व १८ आॅक्टोबरच्या दुपारी साडेतीन वाजता विजयादशमी सुरू झाली. त्यामुळे १९ तारीख हा दसऱ्याचा दिवस होता.