Android app on Google Play

 

विशेष

 

ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख 'हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधिस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या.

रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।। ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशिवाली।।

खुब लढी मर्दानी वो तो झांशी वाली रानी थी। ..कवयित्री : सुभद्रा कुमारी चौहान