गोपाळकाला/दहीकाला
गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे.
पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो. हा कृष्णास फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत असे मानले जाते.