दहीहंडी
कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला होतो. श्रीकृष्ण त्याच्या बालपणी आपल्या मित्रांसह गोकुळातील घरांमध्ये जाऊन शिंकाळ्यात टांगलेल्या मडक्यातील दही खात असे. त्यासाठी मुले मानवी मनोरा करून मडके फोडीत असत.ही परंपरा आजही भारतात दहीहंडीच्या रूपाने साजरी केली जाते. 'गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला' असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे.