Get it on Google Play
Download on the App Store

अधिकाऱ्यांची शिरजोरी व माज

        सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो की आपल्या देशात लोकशाही आहे, हे सर्वांना माहित असेलच पण लोकशाही म्हणजे नक्की काय तर लोकांनी लोकांच्या हिताकरिता, लोकांकरिता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाहीचा अर्थ तसा फार सोपा आहे पण देशातल्या अनेक अधिकाऱ्यांना कदाचित माहित नसावा, कि आपल्याला इथे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा लोकांकरिताच इथे आपण नोंदवले गेलेलो आहोत. मी असं मुळीच म्हणत नाही की भारतातील प्रत्येक अधिकारी भ्रष्ट आहे, पण आज अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळेच आपला देश देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहे.
        मी तुमहाला माझ्या समोर घडलेलं उदाहरण देऊ इच्छितो, माझ्या एका मित्राला 11वी च्या admission साठी तलाठ्याच जात पडताळणी पत्र हवं होतं, त्या अधिकाऱ्यासाठी ते काम अगदी सोपं होत, माझ्या मित्राची जातपडताळणी साठी लागणारी सर्व कागदपत्रे तयार होती पडताळणी प्रसाठी लागणाऱ्या प्रतिसकट त्याकडे सर्व कागदपत्रे होती, त्या सम्बंधित तलाठी अधिकाऱ्याला फक्त एक सही शिक्का द्यायचा होता. पण सर्वात पहिली आमची अडवणूक झाली ते शिपायापाशीच, अर्ज तलाठ्यासमोर सादर करण्यासाठीच त्याने चिरीमिरी मागण्यास सुरवात केली. माझ्या मित्राने नशीब थोर कि त्याचा मामाही त्या कार्यालयात आधी कामाला होता, भारत देशात वशिल्या शिवाय काम होणे म्हणजे पेट्रोलशिवाय गाडी चालल्या सारखे आहे, कसा बसा वशिला काढत आमचा अर्ज आत देण्यात आला. आणि आम्हाला आठवड्या नंतर बोलावण्याची सूचना देण्यात आली, एका सही शिक्क्यासाठी आठवडा कसा लागू शकतो हे आमच्या समजेच्या बाहेर होत. मूळ गोष्ट म्हणजे माझ्या मित्राला आठवडाभर वेळ फारच होता, त्याला admission साठी दोन दिवसात सर्व कागदपत्रे कॉलेज मध्ये जमा करायचे होते, असे आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न केला पण शेवटी वशीलाच कामाला आला, परत मामाला फोन करून विनवणी करण्यात आली, शेवटी शिपाई आत गेला काहीवेळाने बाहेर येऊन उद्या येण्याची आज्ञा त्याने आम्हाला केली, थोडासा दिलासा भेटल्याने आम्ही उद्या येण्याचे ठरवले. सकाळी 8 वाजताच आम्ही तिथे येऊन थांबलो आम्हाला वाटलं पहिले आपणच असू, पण आमचा हा गोड समज काचेला कचकन तडा जावा तसा तुटला आमच्या आधी 13 जणांची रांग समोर होती, अधिकाऱ्यांची येण्याची वेळ कोणती हे तर आम्हाला माहित नाही, कालचा शिपायीही आज कुठे दिसत नव्हता तासाभराने खाली (बोंबलत) हिंडताना दिसला, तो दिसताच माझा मित्र पळत त्याच्या जवळ गेला आणि तलाठ्या वद्दल विचारणा केली, त्यावर तो (उद्धटपणे) "मला काय माहित" असं म्हणाला. हे म्हणजे असं होत संडास मालकच आणि रुबाब भंग्याचा. शेवटी तो तलाठी अधिकारी 2.50 वाजता (बाजीरावसारखा) येऊन आत जाऊन बसला, तो पर्यंत माझ्या मित्राने त्याला A to Z (अ ते झ) मध्ये जेवढ्या शिव्या मोडतात तेवढ्या सगळ्या देऊन मोकळा झाला होता, आम्ही 8 वाजे पासून उपाशीपोटी इथे या ***** ची वाट बघत होतो, आणि हा रेटून रेटून एवढा फुगला होता की याची ढेर कधी फुटेल याची कोणीही कल्पना करू शकणार नाही, आतमध्ये जाऊन निम्नझोपेत त्याने समोरची कागदपत्रे हातात घेतली कदाचित काहीतरी काम करण्याचा आव आणत असावा. नंतर त्याची पेपर बघून मनःशांती झाल्यावर त्याने एकेकाला आत बोलवण्यास सुरवात केली. प्रत्येकच काम माझ्यामते फक्त सही शिक्का देण्याचंच असावं असा माझा अंदाज कारण आमच्या मागच्या पुढच्या माणसंच तरी तेच काम होत, 5 वाजून 30 मिनिटांनी आमचा नंबर आला, आत तो तलाठी बघून माझ्या मित्राच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली होती पण आपले काम म्हणून शांतपणे त्याने अर्जावर सहीची व जात पडताळणी पत्राची मागणी  केली, त्याच्या समोर अनेक file चा ढिगारा पडला होता त्याने सम्पूर्ण आमच्या सम्भाष्णात एकच शब्द विचारला तो हि अतिशय माजात "नाव ??" त्यावर माझ्या मित्राने त्याचे सम्पूर्ण नाव सांगितले आमच्या कागदपत्रांची file त्याने शोधून काढली आणि टेबलवरच बाजूला उघडी करून ठेवली आणि नंतर त्यांच्याच कामात गुंतण्याचा आव आणला खूप वेळ गेल्या नंतर मित्राने परत मागणी केली असता त्याने मित्राकडे असं बघितलं कि जणू याने त्यांच्या पोरीचा हातच मागितला आहे, आणि परत त्यांच्या कामात busy झाले, हा प्रकार पाहून शिपाई आत आला आणि त्याने आम्हाला बाजूला घेऊन अगदी नम्रपणे विनवणी केल्या सारखं म्हणला "थोडं द्या त्यांना", आम्हाला नेमकी अडचण कुठं आहे हे कळलं आणि लोकांना आतमध्ये इतका वेळ का लागतो हे हि समजलं, नंतर आम्ही वशीला लागतोय का यासाठी पुन्हा मामाला फोन केला पण शेवटी मामाने पण हात वर केले, मामा सुद्धा म्हणला "दे थोडेफार", तस बघितलं तर आमचं काम आजच्या आज होणं महत्वाच होत कारण उद्याच्या उद्या आम्हाला file जमा करणे आवश्यक होत. शेवटी माझ्या मित्राने करकरीत पिवळी नोट काढून त्याच्या टेबलावर ठेवली त्यावेळी नोटा पिवळ्या आणि गुलाबीच होत्या, अधिकाऱ्याने काही न बोलता गुपचूप कोणी बघत नाही ना असे बघत दोन वेळा दरवाजा आणि खिडकीबाहेर जागेवरूनच डोकावून पहिले, आणि कधी ती नोट टेबलावरून त्याच्या खिशात गेली हे कळलंच नाही, नंतर शून्य मिनिटांत त्याने सही आणि शिक्का देऊन आम्हाला मोकळे केले, बाहेर आल्यावर माझ्या मित्राला नोट गेली पण कागदपत्र मिळाले याची खुशी जास्त होती.
         असे हे अधिकारी लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेतात, आणि सर्वसामान्य लोकं पण स्वतःच्या गरजेपोटी त्यांचे खिसे भरण्यास तयार असतात, त्यादिवशी मला कळले भ्रष्टाचार म्हणजे लोकांच्या सेवेसाठी त्यांच्या गरजेसाठी खुले केलेले वसुली केंद्र आहे. विषय फक्त अधिकाऱ्यांपर्यंतच राहत नाही तर मला सरकारी महामंडळ ST वाहक कर्मचारी ते पोलीस शिपायांपर्यंत पण फार शिकायती आणि अनुभव देखील आहेत.
        मध्ये ST महामंडळ वाल्यांने फार आंदोलनं संम्प वगैरे पुकारले होते, अजूनही आहेत पण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत हे एका अर्थी चांगलं केलं असं माझं मत आहे, आज ST महामंडळ सारखी खराब सेवा कोणतीच खाजगी वाहतूक सेवा देत नाही, यातही एक उदाहरण आहे माझ्याकडे, मी पुण्यात class साठी जायचो आणि सहाजिकच ST महामंडळा च्या BUS ने, माझा class सकाळी 9 ला असायचा आणि दुपारी 1 ला सुटायचा माझं गाव पुण्यापासून 60 km आहे, आपल्या देशात bus वेळेवरच यावी असं काही बंधन नाहीये उलट एखादी खेप चुकवता कशी येईल यावर आपल्या महामंडळाचा जास्त विचार चालू असतो. त्यामुळे bus ची थांबून वाट बघण्यात मी माझा वेळ कधीच वाया घालवला नाही, मी सरळ आमच्या गावाच्या flyover वर जाऊन थांबायचो, आमच्या गावातील एखादाच नवीन माणूस पुण्याला जायला स्टॅन्ड मध्ये जाऊन थांबत असेल नाहीतर जास्त करून सर्व लोक पुण्याला जायच म्हणलं कि flyover वर येऊन थांबतात तिथे भरपूर वडाप, ट्रक सारख्या गाड्या वाहतुकी दरम्यान लोकांना ने आन करत असतात, मी हि खूप वेळा वडाप आणि ट्रक मध्ये बसून पुण्याला गेलो आहे, क्वचितच पुणे सातारा road वरून जाणाऱ्या बस आम्हाला घेण्यास थांबत, ती ही गाडी कधी नाष्ट्याला वगैरे थांबून टाईमपास करत जात होती, त्यामुळे चढण्याआधीच मी विचारून चढायचो कुठे मध्ये थांबणार तर नाही ना? नाही उत्तर मिळाल्याशिवाय मी कधी आत गेलो नाही. पण येताना मात्र हमखास मला तीच गाडी भेटायची जी थांबून जाणारी असायची, फार वैताग यायचा आणि पुण्यावरून वडाप पकडायची म्हणली तर स्वारगेट पासून परत कात्रज ला येऊन वडाप पकडायला लागायची त्यामुळे येताना कधी वडाप मध्ये येन झालं नाही, कोल्हापूर पर्यंत सर्व जाणाऱ्या गाड्या आमच्याच गावावरून जायच्या पण हराम** वाहक मंडळी आम्हाला त्या गाडीत कधी बसू देत नसत, त्यांना एकदम मोसम मध्ये गाडी सातारा कोल्हापूर ला न्यायची असते, एक दिवस मी न विचारता मुद्दाम कोल्हापूरच्या गाडीत जाऊन बसलो, गाडी सुरु झाल्यावर वाहक (कंडकटर) खंबाटकी घाट उतरल्या शिवाय मागे येत नसे, (उभे राहायचा त्रास नको म्हणून) नंतर एकदा का गाडी highway ला लागली की मी मगच वाहक मागे येतो, त्यादिवशी मी तिकीट उशिरा मिळावं म्हणून मागच्या seat वर जाऊन बसलेलो म्हणजे याने लवकर तिकीट काढायला सुरवात केली तरी कात्रज उलटून पुढे गेलो की वाहकाला मला उतरवता आलं नसत. नेहमीप्रमाणे hiway ला लागलो आणि तो माझ्यापर्यंत आला आणि मी माझ्या गावाच  नाव त्याला सांगितलं, नाव ऐकताच तो जनुकाय मी फार मोठा गुन्हा केलाय अशा स्वरात म्हणाला "अरे या गाडीत कस्काय बसला तू" त्यावर मी म्हणलं हि गाडी पण जातेच कि आमच्या गावावरून  त्यानंतर खूप बडबड करून त्याने शेवटी मला उतरवण्याची भाषा केली, मी पण अडून राहिलो म्हणलं मला लिहूनच द्या कि हि गाडी या या गावाला थांबत नाही आणि मोबाईल मध्ये shooting करत त्याच्या तोंडासमोर मोबाईल ठेवला असं करताच त्याने गुपचूप तिकीट हातात देऊन पुढे गेला, हे एवढ्यावरच सँपल नाही आमच्या गावाजवळ आल्यावर मी पुढे आलो तर याने सताऱ्याकडे जाणाऱ्या लोकांना बघू फार पुढे गाडी थांबवली मला उतरवण्यासाठी त्याला थांबवच लागणार होत पण त्याने लोकांपासून फार लांब गाडी थांबवली जेणेकरून लोकांना गाडीत चढता येणार नाही कारण वाहकाला परत उठून तिकीट काढावं लागलं असत, आता मला सांगा एवढ्या कंटाळवाण्या माणसांना का ७ वेतन आयोगाची मागणी करावी, असा कोणता यांनी तीर मारला कि यांनी ७ वेतन आयोग मागितला, सर्वात महत्वाच म्हणजे ७ वेतन आयोग हा प्रकारच मुळी का केला गेला याच उत्तर मला मिळालेलं नाही, आणि हा दिलाही त्यांना जातो जे जनतेचे हाल करतात सुखाने त्यांना कोणतेच कार्य लाभले जात नाही, आणि असल्या मूर्ख माणसांना ७ वेतन आयोग का द्यावा ?? कोणत्या बळावर हे उपोषण आणि संप करतात??? हा खरच प्रश्नात पडणारा विषय आहे.
       
        सरकारी म्हणलं कि पोलीस कर्मचारी हि आलेच. सर्वात बदनाम कोणी सरकारी कर्मचारी असेल तर तो माझ्यामते तो पोलीस आहे, ज्या सरकारी कर्मचार्यांकडे बघून माणसाला आपण सुरक्षित आहोत असं वाटलं पाहिजे त्याच कर्मचार्यांकडे पाहून मानस घाबरून जातात, आज ज्या ठिकाणी खरच पोलिसांची गरज आहे तिथे नसून हे पोलीस पावत्या दिवसभरात किती फाडता येतील याचा विचार करत असतात, यामध्ये सर्वच पोलीस वाईट असतात असं नाही कायद्याच पालन न करणाऱ्यांना तुम्ही पकडा आमच काहीच म्हणणं नाही पण सर्व सामान्य जनता आज तुम्हाला बघून घाबरते किंवा मागून घाण घाण शिव्या देते याची तुम्हाला लाज वाटू नये?? काही पोलीसांना तर पैशाची चटकच लागली आहे, दिवसभरात तीन चार हजार तरी छापल्या शिवाय त्यांना शांत झोप लागत नसावी, तुमचा दबदबा असलाच पाहिजे मान्य पण तुमची गरज असते तेव्हा तुम्ही कुठे असता???
एक उत्तम उदाहरण देतो जर तुम्ही रविवारी खडकवासल्याला कधी गेला नसाल तर एकदा जाऊन या, पण जायच असं की पानशेत लवासा करून संध्याकाळी 6 वाजेर्यंत तुम्ही परत आला पाहिजे, ते याच्यासाठी कि तुम्हाला जाताना वाटेत पोलीस दिसतील 10-12 तरी अडवलेल्या गाड्या दिसतील, ठिके मान्य केलं की तुम्ही licens वगैरे तपासण्यासाठी अडवणूक करता पण संध्याकाळी 6 च्या सुमारास सर्वजण कुठे जातात हो, जेव्हा trafic भयाण पद्धतीने वाढत असत, माझं मूळ गाव त्याच दिशेला आहे, शेतीवाडीसाठी मी दर रविवारी त्या road वरूनच पुढे जात असतो, जाताना कडक बंदोबस्त आणि येताना मात्र भयाण ट्राफिक, डोंणजे गावापासून ते खडकवासला धरणापर्यंत जाई पर्यंत दोन तास गेलेले असतात जो रोड फक्त 20 मिनिटांचा आहे. इतकं ट्राफिक असून सुद्धा एकही पोलीस तिथे आढळून येत नाही शेवटी अधेमध्ये त्या त्या गावची पोर जमा होऊन गुंतलेले ट्राफिक सोडवण्याचा प्रयत्न करतात, थोडीशी लाज वाटली पाहिजे कर्मचाऱ्यांना. वरून त्यांच्या तोंडावर माज एवढा असतो की जणू पंतप्रधान यांच्या घरी जेवायला येऊन गेलेत कि काय असं वाटत. हे फक्त भारतातच होऊ शकत. अरे जरा बाहेर देशातल्या पोलिसांचा आदर्श घ्या, बाहेर देशातले पोलीस कोणत्याच माणसाला हाक सुद्धा एकेरी मारत नाहीत sir किंवा mam या शब्दातच ते त्यांच्याशी बोलतं असतात आणि म्हणूनच तेथील लोकही त्यांना लवकर co-operate करतात, थोडीशी बुद्धी वापरून पोलिसांनी लोकांशी संवाद साधला पाहिजे, उगाचच "ए भडव्या घे रे साईड ला गाडी, काढ licens, दाखव कागदपत्र सगळी, काढ PUC, फाड पावती" असल्या माजूरड्या शब्दात जर तुम्ही जनतेशी बोलत असाल तर जनता तुम्हाला नावं ठेवणारच, बाहेर देशात जर एखादा crime घडलं तर पोलीस 7 व्या मिनिटाला तिथे हजर असतात, आपल्या इथे पिडीतच पोलीस स्टेशनात जातो आणि चौकशीही त्याचीच पहिल्यांदा केली जाते.. फार आणि फार लाजिरवाणी गोष्ट आहे हि. खूप चांगले पोलीस अधिकारी ही आहेत भारतात ज्यांना criminal आणि सर्वसामान्य जनता यातील फरक कळतो त्यांना मी मनापासून मानतो. आणि तसे पोलीस अधिकारी भारतमातेसाठी घडणे फार गरजेचे आहे. आणि हो ते आजवर घडूनही गेले आहेत अश्या बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कसाब सारख्या आतंकवाद्यांना पकडताना जीव गमावला आहे. त्यांचा आदर आमच्या आयुष्यात उच्च स्थानांपैकी एक असेल हे निश्चित.