Android app on Google Play

 

सरकारी योजनांची फसगत

 

        सरकारी काम अन महिनाभर थांब हि एक म्हण खोटी आहे असे सांगणे हास्यास्पद ठरेल. आपल्यातल्या प्रत्येकाला याबाबत कधी ना कधी
अनुभव आलाच असेल. आणि मी याबाबत ठामपने सांगू शकतो की आपल्यातल्या प्रत्येकाने एकदा तरी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला मागून किंवा तोंडावर आई माई वरून शिव्या नक्कीच घातल्या असतील. तो माणसांचा जन्मसिद्ध हक्कच झाला आहे म्हणजे तो सरकारी अधिकाऱ्यांनी ओढवूनच घेतलाय असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी शिव्या खाणे म्हणजे स्वतःवर चढवून घेतलेली पदवीच आहे, विनोदाचा भाग सोडला तर ही आपल्या भारताची फार लाजिरवाणी गोष्ट आहे.
        प्रत्येक सरकारी कामाचा आज काळाबाजार झाला आहे. यात सरकार म्हणजे फक्त मोदी, काँग्रेस,  भाजप वगैरे नाही. तर प्रत्येक सरकारी अधिकारी आज एक सरकारचा भाग आहे. यातील एक जरी भाग नासका असला तरी आपण सरकार ला दोष देतो. खरं तर ती त्या सरकारी अधिकाऱ्याची वैयक्तिक चूक असू शकते पण त्यांच्या वागण्याने सरकारला काळिमा फासला जातो.
        एकटे मोदीजी देश घडवूच शकत नाही. त्यांनी आजपर्यंत अनेक चांगले निर्णय घेतले आहेत, त्यांनी अनेक देश दौरे केले आपले राष्ट्र संबंध अनेक अन्य राष्ट्रांशी घट्ट केले आहेत, पण काही निर्णयात त्यांनी फार गडबड केली किंवा पूर्ण विचार पूर्वक निर्णय त्यांनी घेतले नसावेत असा मला वाटत, त्यातीलच एक म्हणजे नोट बंदी (नोटबदली) त्या विषयाकडे मी नंतर येणारच आहे, त्याआधी मी प्रत्येक सरकारी गाजलेल्या अधिकाऱ्याच्या पदवी विषयी सांगेन. अगदी तलाठी office च्या cabin बाहेरचा शिपाई ते पोलीस शिपायापर्यंत कसे हे अधिकारी भ्रष्ट असतात आणि सरकारी योजनांमध्ये व कामामध्ये अडथळे आणतात आणि कशी सर्व आपली व सर्व सामान्यांची फसगत होते हे पुढे बघा.