रामचंद्राचीं आरती - कमळाधर कमळाकर कमळावर ईशा ...
कमळाधर कमळाकर कमळावर ईशा ।
कमळनाथा कमळकांता सूरेशा ॥
कमळनाभी कमळा साजे सूरेशा ॥
कमळी कमळे साजे स्थापित सूरेशा ॥ १ ॥
जय देव जय देव जय सुंदर रामा ।
करकमळी ओंवाळू तुज पुरुषोत्तमां ॥ धृ. ॥
कमळी कमळे वाहे जनकाची बाळा ।
कमळी कमळे वाहुनि उद्धरली शीळा ॥
कमळी कमळे ध्यातो योगीजनमेळा ।
कमळी तारीयेल्या भवसागरी शीळा ॥ जय. ॥ २ ॥
कमळी कमळे ध्याता तूटे बंधन ।
कमळी कमळे वहाता फीटे अज्ञान ॥
कमळी कमळे गातां अपरोक्ष ज्ञान ।
कमळी एक जनार्दन आहे परिपूर्ण ॥ जय. ॥ ३ ॥