Get it on Google Play
Download on the App Store

रामचंद्राचीं आरती - आरती रामचंद्रजींचीं । सुज...

आरती रामचंद्रजींचीं । सुजानकि राघवेंद्रजीची ॥ धृ. ॥
ध्वजांकुश शंख पद्मचरणा ।
कांति ती लाजविती अरुणा ॥
नखमणिभाति मग्नशरणा । फलद उषशमा जन्ममरणा ॥ चाल ॥
तोडर गुल्फ गजरशाली ।
ग्रथित दशवदन, प्रभुति धृती कदन, विजित सुरसदन, भ्रमसुर कीर्ति वंदनाची ।
निरांजनी कीर्ति वंदनाची ॥ आरती. ॥ १ ॥
तडित्प्रभ पीतवसन जघनी ।
जडित कटि रत्नसुत्र वसनी ॥
जनकजा अंकित शिवजघनीं ।
शिरद्रमि मृगांकवदनी ॥चाल ॥
सुसर हे मुक्तहार कंठी ।
सरळ करि धनुष येष धरि मनुष,
सत्वरी कलुषहरण उटि तनुसि चंदनाची ॥
उटि तनुसि मलयचंदनाची ॥ आरती. ॥ २ ॥
त्रिवली राजित रुइसुम गळां ।
नाभिह्र्द लाजविती इंगळा ॥
उत्तरी यज्ञोपवित गळां ।
वक्षस्थलिं भृदगपदांग सकला ॥ चाल ॥
एकावली दिव्य खङगकोशी ।
विष्टिशत विशांग, शिरपर पिशांग, पक्षजी विशांग, घटितमणी कंकणां गदाती ॥
दिप्तीवर कंकणांगदाची ॥ आरती. ॥ ३ ॥
आनन पुर्णेदु वमन मलिनें ।
कृपार्द्रांकरण नयन मलिनें ।
स्मिताधर रदनरवेवलिनें पाहतां धृतृजन्म मलिनें॥ चाल ॥
मृगमदातिलक उंचभाळी ।
धनुषकोटी; रभिरव कोटी, रगरवकोटी, रविद्युतितरळ कुंडलाची ॥
गुंतली स्फूर्ति कुंडलाची ॥ आरती. ४ ॥
सदसि पुष्पकासना वरती ।
शिरद्रूमि छत्र लसद मूर्ती ॥
सुशोभित सहोदरा वरती ।
भक्तजन पूर्ण करिती आर्ती ॥ चाल ॥
तुंबर गान किन्नरादी ।
अप्सरा छनन, नयन कृत अनन, तनन स्वर घनन, गर्जे ध्वनी बंदि जल्पनाची ॥
मधुर ध्वनी बंदि जल्पनाची ॥ आरती. ॥ ५ ॥

रामचंद्राचीं आरती

भगवान दादा
Chapters
रामचंद्राचीं आरती - आरती रामचंद्रजींचीं । सुज... आरती रामाची - जयदेव जयदेव जयजय श्रीरामा... आरती रामाची - जयजयाजी रामराया करि कृपेच... रामचंद्राचीं आरती - दशरथराजकुमारा धृतमुक्ताहा... रामचंद्राचीं आरती - अवतरला रघुपती जे । आनंदली... रामचंद्राचीं आरती - सर्वही वस्तु त्वद्रुप मज ... रामचंद्राचीं आरती - जय देव जय देव जय आत्माराम... रामचंद्राचीं आरती - स्वस्वरुपोन्मुबुद्धि वैदे... रामचंद्राचीं आरती - काय करुं गे माय आतां कवणा... रामचंद्राचीं आरती - श्यामसुंदर रामाचे चरणकमळी... रामचंद्राचीं आरती - नयना देखत जन हे विलयातें ... रामचंद्राचीं आरती - दशरथ राजकुमारा धृत मुक्ता... रामचंद्राचीं आरती - कमळाधर कमळाकर कमळावर ईशा ... रामचंद्राचीं आरती - साफल्य निजवल्या कौसल्या म... रामचंद्राचीं आरती - त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे ग... रामचंद्राचीं आरती - अयोध्या पुरपट्टन शरयूचे त... रामचंद्राचीं आरती - ऎकावी कथा कानीं राघवाची ,... रामचंद्राचीं आरती - श्रीमद्रामचंद्रा अयोध्याप... रामचंद्राचीं आरती - स्वात्मसुखामृत सागर जय सद... रामचंद्राचीं आरती - राक्षसंभारे पृथ्वी बहुभार... रामचंद्राचीं आरती - तव ध्यानें माझें मन मोहित... रामचंद्राचीं आरती - आजि रघुपति तव चरणीं करितो... रामचंद्राचीं आरती - बंबाळ कर्पुराचे । दीप रत्... रामचंद्राचीं आरती - रत्नांची कुंडलें माला सुव... रामचंद्राचीं आरती - विडा घ्याहो रघुवीरा । राम... रामचंद्राचीं आरती - आरती करितों राघवचरणीं । ... रामचंद्राचीं आरती - परमात्मा श्रीरामा महामाया... रामचंद्राचीं आरती - विडा घ्याहो रामराया । महा... रामचंद्राचीं आरती - काय करुं माय आतां कवणा ओव... रामचंद्राचीं आरती - दशरथे रामचंद्रा कौसल्या प... रामचंद्राचीं आरती - जय देव जय देव जय मंगलधामा... रामचंद्राचीं आरती - जय जय श्रीरामचंद्रा भक्तव... रामचंद्राचीं आरती - जय देव जय देव जय चिन्मय र... श्रीरामाची आरती - जयजय रघुनंदन प्रभु, दिन द...