श्रीएकनाथांची आरती - भानुदासाच्या कुळीं महाविष...
भानुदासाच्या कुळीं महाविष्णुचा अवतार । आदिक्षेत्रीं स्नान वस्ती गोदातीर ॥१॥
ओवाळूं आरती स्वामी एकनाथा । तुमचें नाम घेतां हरे भवभयचिंता ॥२॥
जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद । भागवती टीका नारायण आत्मबोध ॥३॥
ब्रह्म विष्णु महेश ज्याशी छळावया येती । न ढळे ज्याची निष्ठा होती एकात्मता भक्ती ॥४॥
कावडीनें पाणी ज्या घरीं चक्रपाणी वाहे । अनन्य भक्तिभावें निळा वंदी त्याचे पाये ॥५॥