आरती भैरवाची - जयदेव जयदेव जय भरवराया । ...
जयदेव जयदेव जय भरवराया । इच्छा वाटतसे बहु तुझे गुण गाया ॥धृ॥
कैलासाहुनि येणें केलें सत्वर ।
काळभैरवरूपें घेउनि अवतार ॥
पंचक्रोशीमाजी पापाचे भार ।
दंडुनिया भक्ताचा करिसी उद्धार ॥ जय ॥१॥
काशीक्षेत्राचा बहु केला प्रतिपाळ ।
ह्मणवुनि तुज ह्मणती श्रीक्षेत्रपाळा ।
अखंड हस्तकिं शोभे डमरु त्रिशूळ ।
सर्वहि छेदन केलें असुराचें कूळ ॥२॥
अश्वारूढ होउनि पृथ्वीच्या वरी ।
निजदासाचें रक्षण करिसि बहुपरी ॥
स्वच्छंदानें येउनिया कृष्णातीरीं ।
शरणागत नीरंजन आरती करी ॥३॥
कैलासाहुनि येणें केलें सत्वर ।
काळभैरवरूपें घेउनि अवतार ॥
पंचक्रोशीमाजी पापाचे भार ।
दंडुनिया भक्ताचा करिसी उद्धार ॥ जय ॥१॥
काशीक्षेत्राचा बहु केला प्रतिपाळ ।
ह्मणवुनि तुज ह्मणती श्रीक्षेत्रपाळा ।
अखंड हस्तकिं शोभे डमरु त्रिशूळ ।
सर्वहि छेदन केलें असुराचें कूळ ॥२॥
अश्वारूढ होउनि पृथ्वीच्या वरी ।
निजदासाचें रक्षण करिसि बहुपरी ॥
स्वच्छंदानें येउनिया कृष्णातीरीं ।
शरणागत नीरंजन आरती करी ॥३॥