कांकड -आरती परमात्मया रघु...
कांकड-आरती परमात्मया रघुपती ।
जीवीं जीवा ओंवाळित निजीं निजात्मज्योति ॥ध्रु०॥
त्रिगुण कांकडा द्वैतधृतें तिंबिला ।
उजळली आत्मज्योति तेणें प्रकाश फांकला ॥१॥
काजळी ना दीप अवधें तेज डळमळ ।
अवनी ना अंबर अवधा निगूढ निश्चळ ॥२॥
उदय ना अस्त जेथें बोध प्रातःकाळीं ।
रामी रामदास सहजीं सहज ओंवाळी ॥३॥