Get it on Google Play
Download on the App Store

प्रस्तावना

साईबाबा (इ.स. १८५६ – १५ ऑक्टोबर, १९१८) एक भारतीय हिंदू संत होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना 'शिर्डीचे साईबाबा' म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.

साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली कारण त्यावेळी मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा लोक वापरीत असत, साई चा अर्थ 'फकीर' किंवा 'यवनी संत' असा आहे. साईबाबांसाठी हिंदू मुस्लांसह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. "सबका मालिक एक" हे साईंचे बोल होते.

१५ ऑक्टोबर १९१८ रोजी दसर्‍याच्या दिवशी साईबाबांचे शिर्डीतच निधन झाले.