Get it on Google Play
Download on the App Store

Bhaag 1

लेखक :तेजस भोसले 


   सकाळी सकाळी माझा उठायचा मूड नव्हता. आणि माझ्या मनात पण नव्हतं .रात्री दारातल्या लिंबा खाली झोपलो होतो  . तसाच पडून मी अंथरुणात लोळत होतो.  आणि वारा पण गार सुटला होता . पक्षांचा चांगलाच किलबिलाट सुरू होता. सूर्याची तिरपी किरण माझ्या डोळ्यावर पडत होती आणि लिंबाच्या झाडाच्या बुंदयावर पडली होती. तवा त्याचा तपकिरी रंग आता सोनेरी वाटू लागला होता. आणि लिंम्ब बी मीच राजा या अवेशात डोलत होता. माज्या शेजारची मित्र मंडळी कवाच उठुन आपल्या उद्योगाला गेली होती .आणि राहिलो होतो मीच एकटा पण आता मला भी उठलं पाहिजे म्हंटल ,कारण माझ्या बाची कवाच पहिली हाळी आली होती. "ए उठ की र, तुझा बा श्यान घाण काढणार हाय वि र ? 

तस आमच्या बापू न म्हंटल तरी मी काय उठलो नव्हतो .

पण तुम्हाला सांगायचं म्हंजी आमच्या बापूच्या एक नियम हाय एखादयाला तीन वेळा बोलवायच आणि चवथ्या वेळ ला बरोबर चप्पल फेकून मारायचं  .

मीच मनाला म्हंटल होत एक दिल्या नवका अजून 2 बाकी हायती च की . पण आज बापू न दुसऱ्याच हाळीला वार्निग दिली  

"ये बेण्या उठ का हणू येऊन"? म्हणलं खरच इल आणि एखाद्या नव्या तरण्या सूनन सासू वरचा राग कपड्या वर काडावा तसा मला कुंदल कुंदल कुंदलील उठलंच पाहिजे म्हंटल, आणि उठलो पण मी उठायचं म्हंटल आणि मी रात्री संरक्षण कवच घेतले होते की नाय अंगावर मजी माझी गोधडी या मध्ये माझा पाय आणि हात दोनी बि अडकलं होत. आव अडकणार च की . नाय कस सांगा तिला बी शत्रूला बगाया दुर्बिन्या लावाव्या तश्या दोन भली मोठी होल होती. मग मी पण आयडिया करायचा एक होल दोसक्यात अडकवायचा, आणि दुसरं पायात . याचा एक फायदा असायचा. माझी वाकाळ रात्रीच्याला कोण वडायच नाही .

आव आमच्या इथं हातरुणा साठी लय वडा वडी . ती सखीच गोट्या रात्रीच फुल पिऊन यायचं आणि ज्यो कोण झोपला असलं त्याच वडायच. मग ती बसायचं थंडीत आणि ह्यो झोपणार .असच चालायचं मग माझं कोण वडायचंच नाय आता कसा तरी मी माझ्या कवचातुन बाहेर आलो. वैशाख महिना चालू होता दुपारी ऊन आणि पहाटे थंडी वाजायची

पण त्या उनाचा माझ्या गावावर नकबर बी फरक पडायचा नाही. आव कसा पडणार माझा गाव एखाधी गवर नटवावी आणि तिला हिरवा शालू नेसावा तसा हीरवा गार होता .सकाळी 4लाच उठून सगळे कामाला लागायची बायका जात्यावर दळण दळायच्या. दगडी जाती आणि त्यावर पडणारा सखू मावशी  लता काकू आणि बाकीच्या बायका दळण दळताना खूप छान गीत गायच्या .

मला त्यातलं अजून आठवतय 

माझ्या भावाच्या गावाला वाट जाती डोंगरातली ...

डाळ दळती मी आठवण काडती म्हयारची.. 

साथ दे र पांडुरंगा निरुप दे माझ्या बापा .. 

सखू राहती सुखान त्याला भी सुखी ठेव आनंता ...

डाळ दळती मी ग मुगाची 

आठवण आली गा माय बापाची ...

अस तिझ सुरेख गीत कानावर पडलं की मला भी रडू यायचं .



असा माझ्या गावचा पसारा चालू होता मी पण उठून आता कामाला  लागलो होतो लगीन घाई सुरू होती .गावातली जाणती मांनस जमल त्याची लग्न जुळवाय माग होती . मी पण माझ्या लग्नाची अशीच वाट पाहत होतो .आज अप्पा कुणाचं तरी स्थळ घेऊन आमच्या गलीकड जाताना दिसला .

क्रमशः

[06/06, 12:45 p.m.] Tejas  Bhosale: धरणातले गाव 

लेखक :तेजस भोसले 

       आज वाटलं बहुतेक आप्पा आपल्या घराकडं सरकणार अस वाटल्या नंतर माझ्या बी मनात जरा उकळ्या फुटायला लागल्या होत्या. आव अप्पा म्हणजे लय कडक माणूस चांगलं टोकदार नाक,घारुळ डोळे, उंची सहा फूट ,डोक्यावर कायम लाल किंवा पिवळा जरीचा फेटा, अंगावर पांढरा कुर्ता, आणि कायम धोतर व्यवस्थित केलेलं.दिसायला एकदम देखणा असा पिळदार मिशा, पांढरी दाढी छातीपर्यंत वाढलेली, कायम फरशी  कुराड हातामध्ये .आणि पायात कोल्हापुरी चप्पल कर कर वाजत्याली. आप्पा आला की लांबूनच लोक ओळखायचे. अप्पाला  गावातले लहान पोरापासून ते म्हाताऱ्या मानासापर्यंत सगळे अप्पाच म्हणत.अप्पाच खर नाव आकाराम होत अप्पाचा शब्द म्हणजे पुढील माणसासाठी तलवारीची धारी प्रमाणे असे. अप्पा बोलला की माणूस मानेनेच व्हय म्हणायचा. आणि असा आप्पा आमच्या घराकडे वळला मला अजूनच उकळ्या फुटल्या .मी पण घराच्या पुढच्या दगडावर बसलेला अप्पा आला की व्यवस्थित बसलो .आणि अप्पा  मला बगून  म्हणला .ये पोरा काय करतुय र ....?आवाजात पण तो भरदार पणा लगेच जाणवला. काय नाय बापू आपली हाय ती जमीन कस्तुया.आर किती हाय र ..? अप्पा ला आमची जमीन म्हायती होती पण मुद्दामच विचारलं मी पण सांगितलं हाय की मस्त, आर पण मस्त म्हंजी किती? मोप हाय 102 एकर हाय की , 

       होय आमच्या गावाकडे प्रत्येकाला चांगलीच जमीन प्रत्येक जण 100 एकर 150 एकराचा मालक हाय .आम्ही पन सांगून टाकले तो पण हसतच म्हणला बर बर आणि आमच्या घराला वळसा घालून त्यो पुढच्या शश्याच्या घराकडं गेला . तशी माझ्या उकळी चा रटच गेला .मग मीच म्हंटल मनाला जायना का यंदा आपलं नाय तर बाब्या च तरी असू दे की..म्हणारच की ओ दुसरं तरी काय करणार. मग त्यो पुढं गेला की मी हळूच त्याच्या मागणं जाऊन टेकलो.अप्पा आल्याच पाहताच हवसा काकी लय खुश झाली.तीन अप्पाला बसायला लगेच घोंगडी टाकली .तांब्या भरून दिला . आणि चुलीवर चहा टाकला त्यात गूळ टाकला आणि चहा भी  रट रट करून शिजू लागला . चहाला उकळी आली की लगेच तीन सोधन्यान सोधून त्याच्या हातात दिला .आणि आपल्या डोई चा पदर सरळ करीत ती त्याच्या पुढे भीतीला टेकून बसली . बोला अप्पा काय म्हणताय ? अप्पा चहा घेत माझ्याकडे बगून म्हणला पोरा चहा घे की... मी मानेनेच नाय म्हंटल . मग लगेच त्यानं हौसा काकीला म्हंटल वहीने आग शशी कुटाय ? तसं तीन आत्ताच येतील अस म्हंटल आणि नेमका शश्या दाजी आला .. शश्या दाजी म्हंजी आमच्या गावातलं  एक विनोदी पात्र होत. एकदा काय झालं दारका काकू ला दूध घालताना दारका काकू म्हणाली आव भावजी दुधात पाणी लय हाय की ..तर हिला म्हणतंय "वयने म्हशीला किती भी म्हणलं की पाणी कमी पे कमी पे तरी काय ऐकत नाय 3 टाईम पाणी पिती आणि अस दूध दिती बग"  . असा हा दाजी कायम डोक्यात टोपी ती ही गांधी तिरपी टोपी घालून फिरणार ,अंगात सदरा मळका. लेंगा पायापर्यंत लोळणारा , उंची सादारण 4 फूट , रंग सावळा, कायम तंबाकू दाढ खाली धरलेली , आणि चेहरा हसत मुख, बोलता बोलता विनोद करत असणारा हा दाजी आप्पा ला पाहताच वाकून राम राम करत म्हणाला आज कस काय येन केलं   ? अस म्हणताच अप्पांन विषयाला हात घातला आर आपल्या बाबू च लगीन करायला पाहिजे की यंदा .

होय पाहिजे की तर नाय करून काय ब्या ला ठेवायचा हाय वि ।। अस म्हणून दाजी हसला .

आणि परत गप होऊन लगेच म्हणला आर पण पोरगी कुठली ? आणि बाबू हाय महमय ला मग कस करायचं ? दाजी न प्रश्नार्थक सूर वडला.त्याच मी बगतो अप्पा म्हणला तेवढ्यात हवसा काकी बोलली की भावजी पोरगी कुठली गाव नाव काय? असं म्हणताच अप्पान बंडीच्या किष्यातली पत्रिका काढून दोंगाच जुळलं तर पुढं बगायच अस सांगितले आणि पत्रिका दाजी च्या हातात ठेऊन निघाला .

तो निघून जाताच हवसा काकी च्या डोळ्या पुढून सगळं तरळायला लागलं . गेलेलं दिवस आठवायला लागलं बाबू बारका होता . आणि 

क्रमशः

[06/06, 12:45 p.m.] Tejas  Bhosale: कथा : धरणातलं गाव 

लेखक : तेजस भोसले 

           भाग :3 

    बाबू बारका होता . आणि सगळी पोर अंगणामधी खेळत होती . परिस्थिती तशी बेताचीच होती. खायला एक वेळ भेटायचे तर कधी कधी पाण्यावरच भागवायला लागायचे. घरात खाणारी मानस पाच आणि कमवणारा माणूस एक आणि तोही नाय नोकरी नाय धंदा फक्त भागवायच चाललं होतं माश्याच्या धंद्यावर . ते बी घावल तर घावल नाय तर नाय. मास धरून पार नदी पार करून पलीकडच्या गावात मास इकायला जायला लागायचं. आणि ते बी एखाद येळला  नावाडी जागेवर असला तर बरं . आणि असला  तर मानस येई पर्यंत तो ही वाट पाहत असे. मग तो पर्यंत इकडे सकाळी ताज मास धरल्याल पाक शिळपटवून जायचं. मग गिरायक भी कमी भावानं मास घेत असत .  मग आल्याला पैशात दाजी दारू पिऊन येई. मग त्या दिवशी सगळी गप उपाशी झोपी .

असाच एक दिवस पोर लहान असताना बाबू च्या पाठीवरचा सुरेश आम्ही सगळी अंगणात खेळत होतो . दाजी आलं आणि सुरेश ला अंगणातून घेऊन गेलं.

नदीला जाळ टाकलं होतं याला काटावरती बसवला होता . आज पोरानं काय खाल्लं नव्हतं म्हणून हौसा काकी जरा काळजीत होती.

शेजारणींन दारका आक्का न जरा कन्या दिल्या होत्या . आणि पोरासनी बोलवायला बाहेर आली होती . बगते तर धाकटा नाय. तवा तिला समजलं की दाजी घेऊन गेलं. आज जरा तिच्या काळजात धस्स झालं. आज सकाळीच टिटवी घरावरून वळसा घालून खालच्या बाजूला गेली होती.रात्री दारात कुत्रं गळा काढून रडत होत. आणि मन भी जरा नाराजच होत. त्यातच हिच्या मनात आज कालवा कालव झाली होती. हौसा काकी मनालाच म्हणाली असलं काय तरी म्हणून बाबू ला घेऊन गेली. आम्ही आमचा डाव रंगात आला होता आम्ही पोर डावात मग्न होतो. इकडे दाजी पाण्यात उतरला होता . घट्ट झाडी नदीच्या कडला. सकाळच्या उन्हाची तिरपी किरण पडत होती . जरा सूर्य वर येऊन भी आज रात कीड झाडावर वरडत होत. वाळू थोडी थोडी तापत होती. आणि हिकडं सुरेश पाण्यात दगड मारत बसला होता.

        आज दाजी न बरोबर भी कोणाला आणलं नव्हतं. फक्त सुरेश आणि दाजी. कडन झाडांची चांगलीच कींजाळ वाढली होती. जंगली प्राण्यांनी धुडगूस घातला होता. रात्री 8 पुढ रस्त्यावर यायचं म्हंटल की एखाद अस्वल किंवा वाघ किंवा रान डुकरं नेमकं आडवं असायचं. चांगलं चांगलं विषारी साप तर रस्त्यावर इटूळ घालून बसलेलं असायचं  अशा वेळी जीव मुठीत घेऊन जायला लागायच. आज दाजी पाण्यात उतरलं होत इकडे सुरेश ला फुल पाखरू दिसलं. सुरेश फुलपाखराच्या मागे पळत सुटला . कशाचं ही भान नव्हतं. फक्त तो पळत होता. फुलपाखरू वेली वरून ते आता घाणेरी वर चढलं होत. घाणेरी वरून ते गारवेळावर आणि सुरेश त्याच्या मागून पळत सुटला होता. ते हळूच त्याच्या हाताला लागायचं आणि पुढच्या क्षणी ते पुढे उडायचे आता तर ते गवतावर आल होत. गवत चांगलच दाट होत. सुरेशला मात्र कशाचं ही भान नव्हतं. तो मात्र फुलपाकराच्या मागून पळत होता. बागडत होता .मनात त्याला फक्त पकडण्यासाठी जिद्द होती. त्याला कशाचं ही भान नव्हतं.सुरेश आता त्या फुलपाखराच्या पाठीमागून दाट गवतात शिरला होता. गवताच्या मध्ये थोडं घोट्या इतकं पाणी होत . हा अनवाणी पायाने त्याच्या पाठी मागे पळत होता . पळत होता. इतक्यात फुलपाखरू फुलाच्या झाडावर बसलं आणि हा हात घालणार इतक्यातच त्याला काय तरी चावल. क्षणात सुरेश ने हात झटकला. मुंग्या पार डोक्या पर्यंत गेल्या . वेदना असह्य झाल्या. डोळ्या पुढे अंधाऱ्या नाचू लागल्या आणि तोंडातून जोरात आवाज आला आई ग मेलो.... वाचीव मला..... असा आवाज शांत वातावरणात घुमला त्याचे ते रडणं थोडं वातावरणात घुमल. आर्त किंकाळीन  पाक आभाळ गरजल आणि तशीच हाक दाजी च्या कानावर पडली . दाजीच्या हातातलं जाळ तसच खाली पडलं . पायाखालची वाळू सरकली. मगा पासून माशावर खेळणारी नजर आणि मासे शोधणारी नजर आता पोराला शोधू लागली.काळजाच्या तुकड्याला शोधू लागली.पेलेली दारू झटकन उतरली. नशा कधीच पळाली . आणि नजर सगळी किनारा शोधू लागली. नदीचा काट नजरेने कधीच पार केला होता. हृदय आता जोरात धडधड करत होत. पाण्या मधून बाहेर यायचं सुधारत नव्हतं. कस बस आता दाजी पाण्याच्या बाहेर आला होता. बगतो तर पोरग नव्हतं. दाजी ला जायचं कोठे ते आता सुधारत नव्हतं. काय करावं ते सुचत नव्हतं. पोरग का वराडल तेच कळत नव्हतं. दाजी खाली बसला. घाम आता धरधरून फुटला होता डोळ कवाच पाण्यानी डबडबल होत. देवा काय करू कोठे जाऊ असा देवाचा धावा चालू होता. सुरेश ये सुरेश..... आर कुठयस असा आवाज दिला होता. पण परत उत्तर आलं नव्हतं .देवा वाट दाखिव र.... पोरग हाक भी परत देत नाया र .. भरल्या कंटानच दाजी आभाळाकड बगत म्हणत होता. आणि त्याची नजर नदी काठच्या चिखलाकड पडली त्यात सुरेश ची पावलं उठली होती. दाजी ला सुरेश ची वाट सापडली होती . आता दाजी त्या वाटेने सरळ चालला होता. वाळूतून पावलं भी झटाझटा उचलत नव्हती. जमीन नुसती सरकत होती. अंगावरची बंडी घामानं चिप झाली होती. सुरेश ये सुरेश... आर बोल की काय झालं असं म्हणत दाजी पायाखालची जमीन तुडवत चालला होता. डोळ्या पुढं अंधार्या असताना ही चालत होता  आता दाजी घाणेरी बगून गावताकड निघाला होता.. 

अजून ही त्याला सुरेश चा पता लागला नव्हता . जीव नुसता कासावीस झाला होता . पोराच्या काळजीनं आता धड धड पन जोरातच वाढली होती. डोक्यात इचारांचं काहूर माजलं होत. इकडं टिटवी जोर जोरात वरडत होती. काय करावं ते काहीच सुचत नव्हतं नजर फक्त सुरेश ला शोधत होती...

      आता नजर गवत पार करून पुढे सरकली होती आणि दाजी पुढे पाहत राहिला होता . पाहतो तर.......

क्रमशः

[06/06, 12:45 p.m.] Tejas  Bhosale: कथा : धरणातलं गाव

लेखक : तेजस भोसले

भाग :४

       पाहतो तर काय आव पोरग पार काळ नीळ पडलं होतं. आणि शेजारी भला मोठा नाग फणा काढून अजून फुत्कार टाकत होता. गोरा पान रंग पार बदलून कवाच निळा झाला होता. सुरेश च्या गालावरून तोंडातला फेस पडून वगळला होता. सुरेशने घासलेल्या टाचा तशाच दिसत होत्या. आजून ही त्या टाचाना लागलेला चिखुल तसाच दिसत होता. हात आभाळाकड केलं होतं. दोनी हाताच्या मुठी घट्ट आवळून घेतल्या होत्या .  एखादा यम राखण बसावा तसा तो नाग अजून त्याच्या बाजूला तसाच बसून होता. पोराच डोळं कवाच पांढर झालं होतं. श्वास चालू हाय का नाय ते बी बगायच दाजी च धाडस होत नव्हतं. पण शेवटी दाजी न त्या नाग रायाला हात जोडून विनंती केली . देवा असा का परीक्षा घेयाला लागाला हायस. झाल का आता तरी समाधान . आता तरी सोड की त्याला . चुकलं असलं तर माफ कर की र.... माझा सुरेश मला परत दे र.. .परत कधी त्यो तुझी खोड काढणार नाय. आर नाग राजा त्यो भी बाळ राजा च हाय र ।।।।

चुकलं असलं तर माफ कर र ...सोड की त्याला ... दाजी दाटल्या कंटानी विनवणी करत होता. नागाच्या हाता पाया पडत होता. पण नाग मात्र विनवण्या करून भी माग सरत नव्हता. उलट जास्तच फुत्कार टाकत होता. फणा आणखीनच वर निघत होता. शेवटी दाजीन विनवण्या करून भी त्यो माग सरणा.आता दाजी न मन घट्ट केलं, कठोर केलं पोरासाठी जीवन आता टांगणीला लावलं. एकदा  इकडं तिकडं पाहिलं शेजारी पडलेलं चांगलं बाबळी च लाकूड घेतलं, डोळं आता रागानं लाल भडक झालं होतं, मगाचा विनवण्या करणारा दाजी आता कवाच पळून गेला होता, आता फक्त उरला होता तो एक बाप. आपल्या पोरा साठी मरायला तयार झालेला एक पिता. आता हुइल ती हुइल या आवेशाने पेटलेला एक जन्मदाता, शेवटी त्यानं निर्धार केला. नागावरती पहिला वार केला. पहिला च वार जरा वर्मी बसला. पण त्यातून भला मोठा साप वाचला आणि जास्तच खवळला. नागान आता सुळकरण झेप दाजीच्या अंगावर टाकली पण दाजीन चपळाईने ती हुकवली आता दाजीचा कवाच हात कमरला आडकीवलेल्या परची वर गेला होता. परची चांगलीच दुधारी होती पांढरी शुभ्र होती. आता पर्यंत फक्त वेली आणि पान व झुडपा वरच चालली होती.पुन्हा एकदा नाग वळला आणि त्यानं पुन्हा झेप मारली दाजीन एकच वार केला दोनी बाजूला दोन बरोबर मधनच तुकड पडल होत.  चांगलं पसा बर रक्त जमिनीवर पडलं होतं . आज दाजी लढला होता, आज त्यो झगडला होता. पोटच्या गोळ्या साठी मरणाशी त्यांन युद्ध केलं होतं. भान हरपून त्यातनं त्याचा जीव घेतला होता. दाजी त्या मेलेल्या सापाच्या खनडुळी कड बगत होता. इतक्यात आकाशातून टिटवी चा आवाज आला.त्या कर्कश आवाजानं दाजी भानावर आला. आपल्या पोराचं त्याला ध्यान झालं. दाजी न त्याच्या कड बघितलं . जवळ जाऊन हात हातात घेतला . सगळं निळं पडलं होतं . शरीर सगळं कवाच थंड पडलं होतं. दाजीच युद्ध फुकट गेलं होतं. दाजीच्या लाडक्यान कवाच जग सोडलं होत. दाजी आभाळाकड बगून बोट मोडत होता. देवाला शिव्या शाप देत होता. पण आता कशाचाच उपयोग नव्हता. थरथरणाऱ्या हातान दाजीन सुरेशला मिठीत घेतलं. हातात अजून फुलपाखरू तसच फडफडत होत सुरेश ची मूठ त्याला सोडायला तयार नव्हती . दाजी न त्या पाखराला मुक्त केलं. पण त्या बरोबर ते सुरेशचा जीव घेऊन गेलं.

 खरच ती फुलपाखरु नव्हतं. असच दाजीला वाटलं . देवानं सुरेशला बोलवायला बोलावणं पाठवलं होत. आणि ते बोलावणं सुरेशने मान्य केलं होतं. दाजीन सुरेश च डोळं हातानं बंद केलं. त्याला कवळ्यात धरलं. आणि दाजीन  हुंदका सावरत गावाकडं आणलं. दाजी गावनदरीला हाय तवरच आक्या गावात बातमी पसरली. सुरेशला पान लागलं . सुरेशला पान लागलं. अस समजताच आक्का गाव जमा झाला. लहान पोरा बसणं ते म्हाताऱ्या माणसा पर्यंत सगळ्यांनी एकच घोळका केला. 100 ते 125 हुम्बरठा असणारा माझा गाव जमून आता दाजीच्या घरा पाशी गोळा झाला होता. हवसा काकी न केलेलं ताट अजून तसच होत त्या मधी शेजारणी कडून वतायला आणलेल्या दुधाची खरपूस शाय काढून ठेवलेली तशीच होती. पण तिला कुठं माहीत होतं की तिजा सुरेश आता नाय. तुझं वाढलेल्या दुधाकड बगायला त्यानं कवाच डोळं मिटल होत. दाजीन प्रेत आता दारापुढं ठेवलं . आणि दाजी चक्कर येऊन मठ किरना खाली बसला. दारातला गोंगाट एकूण हौसा काकी बाहेर आली. तीन दाजीला पहिला पण तिला वाटलं की दाजी पिऊन आलाय. म्हणून ती पुन्हा वळणार तोच तिची नजर सुरेश वर पडली. सुरेश चा काळा निळा ध्येय बगून त्या मावलीची वाचा बसली. उर भरून आलं . डोळं पाण्यानी डबडबले आणि जोरात किंकाळी फोडली सुरेश ।।।।.।. ये माझ्या सोन्या, माझ्या राज्या, पोटच्या गोळ्या तुला काय झालं बोल की ये माझ्या पाखरा. त्या मावलीचा आवाजानं सारा गाव हादरला. शेजारच्या आया बाया बी पदरान डोळं पुसत रडू लागल्या. सुरेशच्या आजीला त्याची आवस्था बगवना आजी न पण पुन्हा हंबरडा फोडला. ये माझ्या बाळा..... उठ की र... मी गोस्ट आता कुणाला सांगू... मी भात कुणाला भरवू... आजीच्या हंबरण्याने गाव अजून शोका कुल झाला प्रत्येक जण रडू लागला. आम्ही पोर डोळ्यातून पाणी काडू लागलो.मोठ्या माणसांनी दाजी ला उठवला. दाजी न हुंदका दिला. जीवापाड जपलेला पोर आज डोळ्या देखत निघून गेला होता. माणसांनी दाजीला सावरला आणि सुरेशला रघची झोळी करून त्यात घातला. सुरेश आता शांत झोपल्याचा भास होता. पण आता सुरेश कायमचाच झोपून जाणार होता. हौसा काकी चा लाडका आता झोपला होता. तिला सांगायला कुणाची चाडी परत येणार नव्हता. माय मावली जोरात ओरडत होती. धरणी माय जागा बी देत नव्हती . तीच रडणं कानठळ्या बसवून जात होतं. दाजीन त्याला झोळीत घातला .तो पुढे चालला . हौसा काकी आडवी आली . पण बायकांनी तिला माग वडली. ती माय नुसती रडत राहिली. तिच्या डोळ्या देखत तिची म्हातारपणाची काठी देवाण नेली. आक्का गाव शोकाकुल झाल. माझ्या कर्मा काय र हे झालं.. सगळं हौसा काकी ला आठवलं आणि तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागल. इतक्यात बाहेरुन कोणीतरी आवाज दिला हवसे ये हवसे आवाज एकताच काकी भाणावरती आली 

आणि मोठ्याने व म्हणाली तो आवाज होता 

क्रमशः

[06/06, 5:30 p.m.] Tejas  Bhosale: धरणातलं गांव


लेखक :तेजस  भोसले


   भाग: ५





      तो आवाज रंजा आती चा होता. रंजा आत्ती साधारण पणे 70ते 75 च्या दरम्यान असणारी म्हातारी होती.कायम अंगावरती लुगडं जरी च असायचं. किंव्हा नववारी शालू तो ही नऊ खणी लागायचा. अति ची उंची खूप होती. पण म्हातार पणा मुळे ती कमरेत वाकली होती. हातात कायम तपकिरी किंव्हा लाल रेशमी  रंगाच्या बांगड्या असायच्या. हातात कायम मोठी लट काठी असे. आत्ती नव्हरा मागेच दोन वर्षा पूर्वी वारला होता. पण कशाने ते नक्की समजलं नव्हतं. त्याच काय झालं आमच्या गावात भुतोबाचा डोंगर होता. तिथं जायला माणस  अमवश्या व पुनवला भी लय भीत असायची पण आमचं राजाराम दादा ब्या च खवाट .कवाच ती असल्या कुठल्या गोष्टीला जुमानत नसायचं .  त्याला जर कोण म्हनल आव दादा..  तिकडं जात जावं नका तुम्ही एकटं धुकट. तर म्हणार का र बाबा... तो आवाजातला करारी पणा लगेच जाणावायचा आणि माणूस गप बसायचा मग परत आवाज यायचा अरर का  बोल की....  मग कुठं तरी पुढचा त्यातून बोलायचं धाडस करायचा.  आव दादा तस नव्ह .  ... तीकड वराड गायब झालंय नवका . आणि ती माणस अमवश्या पुनवला नाचत येतायत. लगीन भी करतायत, आणि सगळं झालं की जेवायला भी वाडतायत,पण जर त्यातून त्यांचं वाढलं तेवढं खावं लागतंय आणि जर कोण बोललं तर त्याला ती त्यांच्यात घेत्याती परत येऊन देत नायती म्हण.... अस म्हणलं की तो लगेच वसायकाचा आर त्यांची काय एवढी हिम्मत हाय वि दादा म्हणत्यात ह्या ध्येयाला. दादा दंडावर हात मारून सांगत असायचा. आणि परत मोठ्याने हसून म्हणायाचा मी किती येळला तिथून जिवून आलूय की र ...पण आर बाबांनो मी घरात एवढं मोठं भूत सांभाळत हायची की... तो रंजा  आत्ती ला उद्देशून म्हणायचा।. पण आम्हाला काय कळायचं नाही. तवा आम्ही पोर तिथं असलो की लगेच बावरायचो. आणि लांबनच म्हणायचो दादा कवा दाखिवणार व..?...तवा दादा म्हणार आता भंगालायला गेलंय आलं की दाखवीन. असच एकदा मला रंजा आत्ती बाहेर बसलेली दिसली. मीच मुद्दाम तिरकी वाट केली न गेलो. आत्ती  न हातात तपकीर घेतली होती. आणि धाकट्या बाळ्याच्या बायकुला  बाहेरनच आवाज देत म्हणाली ये गतकाळे आटपशील का पट्कन. तशी तिच्या हातातला भरला तांब्या गपकन खाली पडला. म्हातारी बाहेरूनच बोलली का ग हातातलं अवसान काय जळ का समद.... अस म्हणताच तीन थरथरत्या अंगाणं नाय म्हणाली आणि आत गेली.मग मी जवळ जाऊन उभा राहिलो आणि आवाज दिला आत्ती ... ये आते .... बोल की र.. मला बी आती न उत्तर दिलं मग मी म्हणलं आग ते रोज म्हणत्यात माणस भुतोबाच्या डोंगरात वराड गप झालंय ते खरं हाय का ग..…     तर आती भी व्हय म्हणाली. व्हय .... 100 आन खर हाय . अस म्हणून तीन डबीतली तपकीर हातात घेतली आणि त्यातली चिमूट भर हाताच्या चिमटीत घेतली आणि जोराचा झुरका मारला. झुरक्याच्या मुंग्या पार मेंदवा पातूर गेल्या. म्हातारीच्या डोळ्यातन पाणी आलं. आणि म्हातारी न चांगल्या दोन तीन शिका झाडल्या . मि तिथंच उभा होतो की ।।। मी थांब भी म्हणलं नाय .आणि शिक भी म्हणलं नाय . शिकना का म्हणलं  आपलं काय जातंय तवा .  कारण आपल्या मनात हे भी नसत आणि ते भी नसत ,कवाच नसत . मग आती न मला गोष्ट सांगायला सुरुवात केली बाळा त्या तिथं जी मांनस गप झालीत की नाय ती बाहेरच्या गावातली हायती त्याच काय झालं बग ।।। लांबच्या कुठल्या तरी गावातन ती लगीन करून आली होती . लग्नात चांगल्या दहा बारा बैल गाड्या होत्या . बैलांची शिंग चांगली बाशिंग लावून सजवली होती. तोरण पार बैलांच्या कपाळावर चकाकत होती . तोरणाच आरस नुसतं लाल फडक्यात विणून सजवलं होत. शिंगाला गोंड बांधलं होत. गळ्यात घुंगाराची माळ खळ खळ करत होती . पाठी वरच लाल  कापड पांढऱ्या बैलावर नजर लागावी अशी सजून दिसत होती . त्या बैलांना गुलालाची पट्टे पट्टे वडले होत. गुलाल टाकून बैलांचा रंग अजून च खुलून दिसत होता. पायातील गोंड रेशमी कापड टाकून विंनल होत. बैल गाडी चांगलीच सजवली होती . आणि प्रत्येक बैल गाडीवर मोठं मोठं ताडपत्री टाकली होती. बायकांची वेगळी आणि गड्यांची वेगळी अशी गाडी सजवली होती. त्या गाड्या एक मेकाला चिटकून चालल्या होत्या. आणि आता दिस मावळतीला  आला होता. थांबायचं कोठ अस जाणत्या माणसांचा इचार चालला होता. तर एक जण म्हणाला की जरा पुढं जाऊ डोंगर उतरलो की नदी लागत्या मग तिथं मुक्काम टाकू. पुढं तशीच चालत ती माणसं चालत होती. घोड्याच्या पाठीवर नवर देव तसाच बसून होता. नवरी बैल गाडीत पडद्या च्या आडाला होती .  दिस बुडायला आला होता . माणसांनी आता गाडीतल्या बत्ती काढल्या होत्या. बत्त्या भी चांगल्याच पेटल्या होत्या. पुढं जंगल लागत होतं म्हणून माणसांनी मशाली पण लावल्या होत्या. डोंगर आता चालून माणसांचं गोळ पार पोटरी ला थाटायला आलं होतं. पोटऱ्या पार वर चढल्या होत्या माणस हळू हळू आता डोंगराच्या कडच्या वाटण नदी जवळ आली. नदी चांगली खळ खळ करत वाहत होती. पाणी किती असलं याचा कुणाला ही अंदाज लागत नव्हता. त्यात अमवश्या असल्यानं चांन भी कायच नव्हतं. बगल तिकडं नुसता अंधार बुडूक पडला होता. रात्र हळू हळू वर चढत चालली होती . वराड भी चांगलंच दमल होत. दिवस भराच्या प्रवासान अंग चांगलच तिडकून गेलंत.मानस दमून गेलती. नदीच्या काठावर सगळी आली .  बायकांनी भराभर गाडीतून उड्या मारल्या. गडी मांनस चांगला खडक शोधू लागली. आणि चांगला मोठा खडक सापडला. खडकाच्या पुढं लागुणच पाणी होत. जेवण करायला ते सोपं भी होत. खडुक मोठा असल्यानं बैल भी बांदायला सोपं पडत होत. म्हणून सगळी तिथंच थांबली होती. सगळी आता उतरली होती.  जेन तेंन आपली साहित्य घेतलं होतं बायकांनी तिथंच चुली मांडायचा ठरवल्या होत्या. काही माणसं बैलाच्या खुंटी रवण्यात मग्न झाली होती . काही हात पाय धुण्यात.  तर काही बायका चुली मांडण्यात, पोर बाळ कवाच झोपून गेली होती . आणि ज्या जागी होती त्या लेकरांच्या आया त्यांना सावरन्यात मग्न होत्या.  चुली मांडून तयार होत्या . काय मांनस सरपण घेऊन भी आली होती. आणि इकडे जेवणाला सुरवात झाली .चुली पेटू लागल्या .जेवनं तयार झाली. आणि  जेवनं  भी जेऊन झाली. मांनस मिळल तिथं खडकावर झोपी गेली. पण ती इसत्वांची राख कुणीच नाय केली . उलट ती सरपण पेटत राहील. त्याची धग वाढत गेली. आणि खालच्या खडकाला जराशी धग लागली. तसा खालचा खडक थोडासा पुढं सरकला. पण झोपेच्या नादात कोणालाच काय नाय कळाला. आता धग वाढली होती . इकडे खडकाची हालचाल वाढली होती . खडक पुढे सरकला होता . मांनस गाढ झोपेत होती . पण त्या माणसांना कळाल नव्हतं की आपण कासवाच्या पाठीत खुंट्या मारल्या होत्या. त्यो खडक नसून एक कासव होत. भलं मोठं कासव . आज ते कासव आज त्यांचा काळच होणार होत . कासवाला धग आता सोसत नव्हती. कासव पुढे सरकू लागलं. ते नदीच्या मदि  गेलं. पण म्हणत्यात ना की काळ आला की माणसाला देव भी उठवत नाय.  इतकी हालचाल होऊन भी कोण जाग होत नव्हतं. ते कासव तसच आत सगळ्यांना घेऊन जात होतं. बरोबर निम्म्या रात्रीला कासवांच्या पाठिवरण आक्क वराड जलसमाधी घेणार होत. आव शांत रातीला आक्क वराड मरणार होत. इवली इवली बाळ ज्यांनी जग भी नाय पाहिलं ती तशीच आईला चिटकून होती. आज तशीच देवाच्या दारी जाणार होती.  नियती आपला डाव मांडून होती. आणि हे वराड आयत त्या डावात अडकलं होतं. कासव आत गेल. त्या धगिन बैचेन झालेलं कासव खाली तळाला गेलं. त्या बरोबर सगळं वराड भी गेलं. आर कोण आराडल नाय का वराडल नाय. सगळं जागच्या जागीच गुडूप झालं.त्यांच्या इच्छा सगळ्या आर्ध्या च राहिल्या. सगळी माणस जल समाधी घेऊन मोकळी झाली.आत्ती गोस्ट सांगत होती. माज्या डोळ्यासमोर हाय असा प्रसंग उभा राहत होता. मी वरून ऊन पडतंय हे भी पार इसरून गेलो होतो.  माझं सगळं अंग घामानं चिप झालं होतं. आत्ती आता सांगत होती. की अस समद घडलं. मग मीच म्हंटल मग ती भूत का झाली ग आत्ते ... आर मुडदया एखाद्याच्या इच्छा माग राहिल्या की माणसं अशी भूत होत्यात. मला भी थोडं भ्याच वाटायला लागलं. मग मला आत्ती न आणखी सांगितलं की ती मांनस अमवश्या आणि पुनवला वरात काढत्यात, नाचत्यात, जेवणाची पंगत करत्यात, आणि जर कोण नवीन चुकून तिथं गेलं तर त्या न तिथं काय बोलायचं नाय. वाढलं तेवढं गप खायचं. बोलला की त्यो भी भूत हुतुया. अस सांगितल्यावर कुणाचं धाडस हुतय का जायचं . मनाला चांगलीच भीती बसली होती व ।। असणा का म्हणलं आपल्याला काय करायचं. म्हातारी म्हणलं काय भी सांगल. अस म्हणून मी डोंगराकड नजर टाकली..... पण खरं म्हंजी आव धाडसच होईना...मग आलो राम राम म्हणत घरी. परत कधी लवकर काय त्या डोंगराकडे गेलो नाय. असच दिवस जात होतं .आणि अचानक गावात बातमी आली दादा वारला. त्या भुतोबाच्या डोंगरात त्याच मड सापडलं. तर कोण म्हणे तो जेवताना बोलला. तर कोण म्हणे आज तो उठून पळत होता.  अशी बातमी मिळाल्यावर मी लैच भ्यालो. ते खूप दिवस झाले तरी माझ्या काय डोसक्यातन जात नव्हत . मग हळू हळू ते मी विसरून गेलो.  अशी आमची आत्ती तिच्या जवळअनेक गोष्टी असायच्या. आणि तीन लय गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडताना पाहिल्या होत्या. आमचं गाव तस खेड गाव होत. दवाखान्यात न्यायची सोय नसल्या कारणाने गावात कोणत्या पोरीच बाळंतपण  करायच असल्यास रंजा आती कड लगेच बोलावणं पाठवायला लागायचं. लगेच कोण तरी पळत तिच्या कडे येत असे. वयानं थकल्या मुळे आती ला पटपट चालता येत नसायचं. मग आती कुणाच्या तरी पाटकुळी वर बसून यायची. तिला बोलवायला कोण मोठं माणूस निघाला की गावातली पोर भी मागणं पळत सुटायची. कारण रंजा आती येता येता गावातल्या गमती जमती सांगत असायची. आज पण ती आमच्या गल्लीतील तायडीच बाळात पण करून आली होती. तिच्या हातातला चुडा पार फुटून गेला होता. तीन हौसा काकी ला आवाज दिला. हवसा काकी न व म्हणताच आत आली. काय ग हवसे. पोराचं लगीन करत्यास म्हण. हवसा काकी न मान हलवली बसा आती म्हणून ती चहा टाकायला गेली. तवर इकडं रंजा आती आपली. डबीतली तपकीर काढून झुरका मारला. आणि जोरात शिंक दिली.  तिचा आवाज घर भर घुमला. आणि त्यो आवाज हवसा काकी च्या सासू न म्हणजे म्हाळसा न एकला. आणि ती भी तिच्या पलीकडं येऊन बसली. आता काय लय दिसाची मैतरिण जवळ बसली की रहावंतय का तीन भी आपली बटवित हात घालून तपकीर काढुन लगेच दिली. म्हाळसा न पण नको नको म्हणत आता तळ हात भरून घेऊन तिची तिला डबी परत केली. आणि झुरका मारता मारता म्हणाली, रंजे सून म्हणे तुझी लय दिस मह्यारला होती म्हण. तशी रंजा आत्ती अजूनच जरा भडकली. तवर हवसा काकी न चहा दिला . आणि तिथं येऊन बसली. रंजा आत्ती न परत विषय काढला. पोराचं लगीन करत्यास वय यंदा.  मग आता केलंच पाहिजे की पोरग वयात आलंय की. हवसा काकी न एकाच दमात सगळं सांगून टाकलं. आग हवसे कर की मी कुठं नाय म्हणत्या वि. अस म्हणून रंजा आत्ती न पुढं सूर वडला. पर चवकशी फिवकशी  केल्यास का तरी. अस म्हणून तीन कपातला चहा बशीत वतला आणि फुरररर करून फुरका मारला. एकाच घोटात निम्याच्या वर चहा हीन संपवून टाकला. 

आग हवशे आज काल काय पोरी चांगल्या अस्त्यात व्हय. अशी म्हणून तीन पुढचा भी चहा वतला आणि सगळा संपवून टाकला. 

काय सवना नादत्यात का. त्यात त्यांच्या लय मागण्या बग।।।।

आग हवशे मला एक गोस्ट तुला सांगायची हाय बग

क्रमशः