Android app on Google Play

 

क्रिष्णा भूतांचा शिकारी

 

सर्वत्र अंधार पसरत चालला होता...काय घडतय.....???
का घडतय..???काहीच कळत नव्हतं......कदम खिडकीतून बाहेर बघत
सिगरेट ओढत होते.....सुबोध अजून एकाच जागी बसून
होता....प्रतापराव इकडून तिकडे चकरा मारत होते.......क्रिष्णा बॅग
मध्ये काही शोधत होता......आणि अचानक बोलला....,"सापडलं...."
तिघेजण दचकून त्याचा कडे पाहू लागले......क्रिष्णा ने त्यांचाकडे
पहिलं आणि बोलला.....,"आईने पनीर भुरजी दिलीय.....खाणार
का....??"

सुबोध भडकला....,"इथे आमचा जीव चाललाय......आणि तुला खायचं
सुचतय...??
क्रिष्णा तसाच हसत हसत खुर्चीवर बसला आणि डबा उघडून खाऊ
लागला......
कदम त्याचा जवळ गेले.....आणि बोलले.....,"अजून खूप सारे प्रश्न
निरुत्तर आहेत...सुशील ला तर मारून टाकलं होत.....ठिकाय
जरी समजा वाचला तर तो महाकाल कसं बनला.....??"
क्रिष्णा तसाच खात खात बोलला......,"पाणी आणा ना यार....."
प्रतापराव जवळ आले.....आणि पाणी दिल......
प्रतापराव चिंतित स्वरात बोलले...,"काय वाईट केल होत
मी त्या मंजिरीच.......तिचा स्वीकार केला होता...खूप प्रेम पण
दिल.....माझे आई वडील तर जीव ओवाळून टाकायाचे तीचावर.......तरी तिने अस केल......"
त्यांचा डोळ्यातून पाणी येऊ लागलं.....
"या प्रॉब्लेम चा काहीच सोल्यूशन नाही का....??" सुबोध निराश होत
बोलला.....
क्रिष्णा उठला आणि बोलला....,"जर कुलूप आहे तर त्याची चावी पण
असणार.....प्रॉब्लेम आहे तर सोल्यूशन पण असणार....फक्त शोधाव
लागणार...."
"पण कस...?? कदम बोलले.....
क्रिष्णा ,त्यांचा कडे पाहत हसत बोलला....,"कदम साहेब.....तुम्ही पोलीसात काम करता ना......तुम्हीच सांगा....काय करायला हव ते....."
कदम विचार करू लागले.....आणि बोलले....,"अरे मी काय करू
शकतो....माणूस असता तर सरल एंकाऊंटर केला असता पण
भुताला मी काय करणार...."
क्रिष्णा बोलला....,"त्या आत्मेणे तिला तुम्ही मुकिती मिळवून देणार
म्हणून तुम्हाला जीवंत सोडलय.......आठवत न..."
कदम चा नजरे समोर तिचा भयानक चेहरा आला.......रडतां
नाचा चेहरा.....,"हो ती आत्मा रडत
बोलली होती....मला मुक्ति हवीय म्हणून........इंटरेस्टिंग......"
"याचा अर्थ तिला मुक्त व्हायचं आहे.....पण तिला मुक्त करायचं
असेल तर आधी तिचा मृत्यू च रहस्य जाणून घ्यावं लागेल...."क्रिष्णा आरामात खुर्चीवर बसत बोलला......
प्रतापरावांना अचानक काही आठवलं आणि ते बोलले...,"डॉक्टर
धुरी.......हो डॉक्टर धुरींनी मंजिरीचा पोस्ट मोरटम केल होत....."
कदम उठले.....,"इंटरेस्टिंग......मग चला त्यांचाकडे.....कुठे आहेत ते
आता.....??
"ते आता हयात नाहीत....."प्रतापराव बोलले......
"पण रीपोर्ट असेल ना हॉस्पिटल मध्ये....."क्रिष्णा बोलला.....
"चला तर मग...."कदम बोलले.....
मग चौघे हॉस्पिटल चा दिशेने जाऊ लागले......
हॉस्पिटल मध्ये दोन तासाचा शोधांनंतर ती रीपोर्ट
त्यांना मिळाली.....जी त्यांना हॉस्पिटल मधल्या एका वयस्कर नर्स
ने शोधून दिली....त्या डॉक्टर धुरी चा असिस्टंट म्हणून काम
करायचा....
कदम रीपोर्ट वाचू लागले.....
"काय आहे त्यात...." सुबोध उत्सुकतेने बोलला.....
"इंटरेस्टिंग........मंजिरी चा शरीराच तापमान 100 डिग्री झाल
होत.....जणूकाही जोरदार विजेचा झटका बसावं तसा...." कदम सांगू
लागले....
सर्वजण ऐकत होते.....
"पण सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट....जी कदाचित प्रतापराव तुम्हाला पण
माहीत नाही..." कदम प्रतापरावांकडे पाहत बोलले.....
प्रतापराव प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.....
"मंजिरी गरोदर होती....."
कदमचे शब्द ऐकून प्रतापराव जागेवरच कोसळले....त्यांचा डोळ्यातून
पाणी येऊ लागलं......
क्रिष्णा ने त्यांचा खांद्यावर हात ठेवला....
"धीर धरा प्रतापराव....या रहस्याची उकल अजून व्हायची आहे....."
"मला काही सांगायचं आहे…." नर्स बोलली....
सर्व जन तिचाकडे पाहू लागले......
"हे पोस्टपोरटम करत असताना एक विचित्र घटना घडली......" नर्स
अगदी घाबर्या. आवाजात सांगू लागली.....
"त्या दिवशी डॉक्टर धुरी पोस्ट मोरटम करून बाहेर आले.....खूप
विचित्र अवस्था होती बॉडी ची.....पूर्ण
बॉडी शिजल्या सारखी झाली होती.......तिचा पोटात मुठी एवढं लहान
बाळाचं अर्भक होत......अचानक एक विचित्र व्यक्ति हॉस्पिटल
मध्ये आला.....चेहर्यापवर केस दाढी वाढलेले.....कपाळावर कवतटीच
चिन्ह होत.....गळ्यात हाड कवटिची माल होती.....अंगावर फक्त
धोतर होत....ते पण मळक.....विचित्र आवाजात मंत्र म्हणत
तो लंगडत येत होता.....त्याचा एका पायाचा पंजा नव्हता.....त्या
ला आमचा कंपाउंडर अडवू लागला तर तो त्याचा मानेला जोरात
चावला....बिचारा कंपाउंडर तडफडत रक्ताचा थारोळ्यात
पडला....सगळे हॉस्पिटल मधून बाहेर पळू लागले......मी पण घाबरून
बाहेर पळून आले.....तो आत सरल मोस्ट मोर्तम चा रूम कडे
गेला.....काहीवेळात जसा आला तसा मंत्र बडबडत निघून
गेला......आणि जाताना किंचाळला......महाकाळ बोलतात
मला महाकाळ......
त्यानंतर आम्ही आत आलो.....तर सर्व काही जसचा तस
होत.....कोणी वेडा असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष केल याकडे..."
"काय चाललय नक्की....??" प्रतापराव डोक्याला हात लावून
बसले.....

"महाकाल उर्फ सुशील ने नक्की बॉडी सोबत काय केल....?? हे
शोधुन काढव लागेल....कदम विचार करत बोलले....
"आणि तो जीवंत कसं राहिला....तो महाकाळ कसं बनला हे शोधणं
ही महत्वाच आहे…"सुबोध बोलला.....
"या दोन्ही प्रश्नांच उत्तर एकच व्यक्ति देऊ शकतो....."क्रिष्णा नेहमी प्रमाणे केसावरून हात फिरवत बोलला.....
तिघे त्याचाकडे पाहू लागले......आणि एकदमच बोलले...,"कोण...???
क्रिष्णा ने त्यांचाकडे काही वेळ पहिलं आणि बोलला.....,"स्वत:
सुशील उर्फ महाकाल....."
"इंटरेस्टिंग.........पण तो सापडणार कुठे.....??" कदम बोलले.....
"रिसॉर्ट पासून उत्तरेला......एक स्मशान आहे......तिथे
राहतो तो...." क्रिष्णा सर्व काही माहीत असल्या सारखं
बोलला.......
"इंटरेस्टिंग.....खूपच माहीत आहे रे तुला.....सुशीलच महाकाल आहे....तो स्मशानात राहतो....आणि खातो काय....ते पण सांग
ना....." कदम मस्करी करत बोलले....
क्रिष्णा हसला आणि त्यांचा जवळ गेला.....त्यांचा पोटावर बोट ठेवून
बोलला......,"हे पोट फाडून....आतल्या आतडया खातो तो......"
आता पर्यन्त हसणारे कदम आता एकदम गप्प झाले...आणि काहीसं
अडखळत बोलले....,"इ.....इंटरेस्टिंग......"
"आजोबांनी ध्यान लावून सर्व गोष्टी जाणून
घेतल्या होत्या आणि त्या डायरी मध्ये लिहून
ठेवल्या होत्या....चला आता जास्त वेळ नाही......स्मशानात जाऊ
आजचा आज सर्व विषय संपवून टाकू...." क्रिष्णा बोलला.....
रात्र खूप झाली होती.....चौघे गाडीतून जंगलजवळ येऊन
पोहचले......चौघे उतरले.....सर्वात अंधार पसरला होता....अतिशय
भयावह शांतता सर्वत्र पसरली होती......त्यात भर म्हणून
की काय.....अचानक आकाशात ढग जमा होवू
लागले.....आणि रिमझिम पाऊस सुरू झाला......
"अरेच्चा....हा पाऊस कसा सुरू झाला अचानक......"सुबोध
बोलला.....
"आपण त्याचा राज्यात आलोय.....त्या आत्मेचा......आणि तिथे
फक्त त्यांची मनमानी चालते....."
क्रिष्णा चा आवाज एकदम बदलल्या सारखा वाटला......
"मग आपल रक्षण कोण करणार त्याचा पासून....." प्रतापराव
बोलले......
क्रिष्णा तिघाकडे पाहत बोलला....,"कोणीच नाही.....आज एक तर
तो महाकाळ मरेल.....नाहीतर आपण.....
"आपण कशाला मरायचं.....साल्याला ठोकून टाकतो....."कदम ने गन हातात घेतली.....
क्रिष्णाने बॅग मधून काही काढलं......रुद्राक्ष चे मणी होते......ते
प्रतेकचा हातात दिल आणि बोलला...,"हे तुमचं रक्षण करेल
त्या आत्म्यापासून......लक्षात ठेवा हे तुमचा पासून वेगळ झाल....तर
समजा तुमचे प्राण वेगळे झाले......."
"इंटरेस्टिंग.....आणि तुला नको का रुद्राक्ष...."कदम बोलले....
क्रिष्णा ने गळ्यात घातलेला मणी दाखवला.....,"माझा गळ्यात कायम
असत....चला आता....."
चौघे त्या सामसुम जंगलातून चालू लागले.....काहीही करून
त्यांना महाकाळ पर्यन्त पोहचायच होत.....
अजूनही पाऊस चालू होता......चौघे चिंब भिजले होते.....त्यांचा जवळ
फक्त दोन टॉर्च होते.....एक सुबोध आणि दुसरी प्रतापरावांचा हातात
होती......कदम गन हातात घट्ट पकडून इकडे तिकडे पाहत एक एक
पाऊल टाकत होते......क्रिष्णा पण अगदी सतर्क पने
चालला होता......
अचानक जोरजोरात विजा कडाडू लागल्या......
खि खि खि खि................
एक भयानक हसण्याचा आवाज घुमला.........
सुबोध घाबरून किंचाळला....प्रतापराव पण घाबरले होते....
"चालत रहा....." क्रिष्णा त्यांना बोलला.....,"आपल्या हातात
रुद्राक्ष आहे....आत्मा आपल्याला काही नाही करू शकत,,,,"
त्या झाडं झुडपातून मार्ग काढत ते चालले होते.......पण ती तिथेच
होती....त्यांचा पाठलाग करत होती......तीच ती.....पांढर्या गाऊन
मधली......लंबसडक केस......पांढरा पडलेला चेहरा......चेहर्या वर
भयानक वार होते.....आणि ती त्यांचा मागे या झाडावरून त्या झाडावर
उड्या मारत येत होती........तिला मारून टाकायच होत
त्या चौघांना....पण काहीतरी होत जे तिला ते करण्या पासून रोखत
होत......तेच ते रुद्राक्ष........म्हणून ती फक्त पाठलाग करत
होती आणि योग्य संधीची वाट पाहत होती..........
ते आता चालत चालत स्मशाना जवळ आले.....जंगला मध्ये
रिकामी असलेली ओसाड जागा होती ती......नुकतीच पावसामुळे
विझलेली राख होती तिथे........टॉर्च प्रकाशात ते काही दिसत का ते
पाहू लागले......आणि अचानक सुबोध चा हातवार कोणीतरी प्रहार
केला.....टॉर्च काही पडली.....तो किंचाळला......लगेच दूसरा प्रहार
त्याचा दुसर्याा हाताचा मुठीवर झाला.....त्याचा हातातील रुद्राक्ष
खाली पडलं......रुद्राक्ष खाली पडताच तिने त्याचा अंगावर झेप
घेतली....
क्षणभर कोणाला काही कळलच नाही......प्रतापरावांनी टॉर्च
फिरवली......टॉर्च चा प्रकाशात ,त्यांना दिसला.....महाकाळ....
कदमणे गन त्याचावर रोखली.....गोळी झाडणार इतक्यात महाकाळ
चा समोर सुबोध ला कोणीतरी धरलं......तीच ती मंजिरी......
महाकाळ विचित्र पद्धतीने हसू लागला.......आणि बोलला...,"ये
दादा.....ये...."
"सुशील....काय हे...." प्रतापराव बोलले....
"सुशील नाही मी.....मी महाकाळ आहे....." महाकाळ किंचाळत
बोलला.....
"चला तुमचा हातातील रुद्राक्ष फेकून द्या.....नाहीतर
ही त्या सुबोधच पोट फाडून टाकेल......
लगेच तिने सुबोध ला हवेत फिरवला.....आणि आणि मांडीवर
घेतलं.....आणि आपली लांबडी नख त्याचा पोटावर ठेवली.......आणि
हलकासा दाब दिला......सुबोध कळवळला....कारण पोटात नख
हलकेसे घुसले होते......
तिघांनी आप आपल्या हातातील रुद्राक्ष क्रिष्णा चा बॅग मध्ये
टाकले.......आणि ती बॅग दूर फेकून दिली......
महाकाळ विचित्र पणे हसत होता.......
"तू जीवंत कसा राहिलास.....??? प्रतापराव बोलले......
महाकाळ्च हसणं बंद झाल.......
त्याचा जवळ गेला आणि बोलला......
"मला तुम्ही मरायला सोडून दिल होत......त्या गावकर्यांलनी खूप
मारल मला....आणि रेल्वे रुळावर बांधून टाकलं.....पूर्ण बेशुद्ध
पडलो होतो मी......जेंव्हा जाग आली तेंव्हा पहिलं की......एक
दुसर्याा गावचा व्यक्ति मला उठवत
होता......मी त्याला बोललो की चोरांनी मला मारून इथे बांधलय.....मग
तो मला सोडवू लागला.....त्याने मला पूर्ण सोडवल......सुटताच
मी जवळचा दगड त्याचा डोक्यावर
मारला आणि माझा जागी त्याला बांधलं......"
महाकाळ हसत हसत सर्व सांगतब होता......
"त्या बिचार्या्ला का मारलस...त्याने तर मदत
केली होती ना......"कदम बोलला....
महाकाळ त्याचाकडे पाहत बोलला.....,"मग मी मेलो नाही ते
सर्वांना कळलं असत ना......त्याला बांधलं इतक्यात जोरदार ट्रेन
आली......आणि......धडम........खि खि खि खि......तुकड तुकड झाल
होत त्याच......खूप भूक लागली होती म्हणून
त्या बॉडी चा आतडया खाल्या......पहिल्यांदाच......मस्त
वाटलं.....खि खि खि......"
"मग तू महाकाळ कसं झालास........?? प्रतापराव बोलले.....
"मुलाखत घेतोस का माझी....??? महाकाळ आणखी मोठ मोठयाने
हसत बोलला.....
"पण देईन तुमचा प्रश्नांच उत्तर......तुमच
ी शेवटची इच्छा समजून......"
महाकाळ उर्फ सुशील सांगू लागला......
"तिथून चालत चालत मी या स्मशानात आलो....तर इथे एक
व्यक्ति बसला होता.....अगदी मरणाचा उंबरठ्यावर
होता तो.......त्याने मला जवळ बोलावलं.......आणि बोलला....त्याच
नाव महाकाळ आहे.....आणि तो काळ्या जादूचा मालक आहे.....पण
मरणा आधी त्याला त्याचा वारस हवा होता......त्या शिवाय
त्याला मुक्ति नव्हती.....नाहीतर त्याचा आत्मा भटकत
राहिला असतं पिशाच्च बनून.......त्याने मला त्याच वारस
केल.....मी पण तयार झालो कारण मला सुड घ्यायचा होता.....मग
त्याने त्याची तंत्र शक्ति मला दिली.....पूर्ण
शक्ति मिळायला मला माझा एका शरीराच अवयव दान द्यायचं
होत.....म्हणून मी माझा पायाचा पाय स्वतचा हाताने
तोडला........आणि एक खडतर तपस्ये नंतर
मला ती विद्या मिळाली.....पण
तो मेला....आणि मी बनलो....महाकाळ......"
"म्हणून तू मंजिरीला मारलस का....?? क्रिष्णा बोलला.....
"हो.....कारण तीच होती कारण या सर्व घटनेची.....म्हणून
तिला भयानक मरण दिल मी......पण मला अजून सर्वांचा सुड
घ्यायचा होता......आई चा बाबांचा.....गावकर्यां.चा.....पण खूप
मजा येते.....काट्याने काटा काढायला......म्हणून
मी मंजिरीचा आत्मेला वश केल.........आणि तीचाकडून घडवलं हे
सगळं.......सर्वांना मारून टाकलं....आणि पळवून लावलं......."
महाकाळ दात ओठ खात सांगत होता......
"मग मला का सोडलस....."प्रतापराव बोलले....
"तुला पण मारायचं होत....पण त्याच
दिवशी तो म्हातारा आला......आणि त्याने मंजिरीला भुंगा करून
त्या हंड्यात बंद केल.......त्यानंतर पंधरा वर्ष मी वाट पाहत
होतो.....मंजिरीचा हंड्यातून मुक्त होण्याची.......पण
ती भुंग्याचा रूपात होती......पण माझा वश मध्ये होती.....मग
मी पुन्हा सुरू केल.....मृत्यूच थैमान......पण पण मी विचार
केला.....किती दिवस स्मशानात राहायचं.....म्हणून मंजिरी पुन्हा कैद
झाली त्या काचेचा बाटलीत....आणि वाट पाहू लागलो रिसॉर्ट पूर्ण
होण्याची.....माझा अपमान करणार्याु गार्ड ला पण मी मारून
टाकलं......मंजिरी कडून....माझा प्रतेक आदेश मानते ती......गुलाम
आहे ती माझी....."
"तू गुलाम कस केलस तिला....." क्रिष्णा ला फक्त हेच जाणून
घ्यायचं होत....
"येडा समजलास का......सगळं नाही सांगणार तुला.....खूप झाल
आता.....आता मरायला सज्ज व्हा....."
महाकाळ ने हातातील काठी ने
इशारा केला.....आणि बघता बघता मंजिरीने आपली नख
सुबोधचा पोटात घुसवली.....आणि पोट फाडून टाकलं.......सुबोध
ची एक किंकाळी आकाशात घुमली......सोबत महाकाळ ही हसू
लागला......
कदमने लगेच गन मधून गोळी झाडली....महाकाळ
ला ती हाताला लागली.....आणि त्याची काठी हातातून पडली......
काठी पडताच मंजिरी चा चेहरा सामान्य झाला......आणि ती रडून
विनवणी करू लागली....,"मला मुकिती हवीय......"
क्रिष्णा चा डोक्यातील विचार चक्र सुरू
झाले......आणि तो ओरडला.....,"कदम....महाकाळ
कडून ,त्याची काठी घ्या......"
पण महाकाळ ने काठी उचलली......आणि काठी आपटून
बोलला.....,"मारून टाक या देसाई चा नातवाला....."
मंजिरीने पुन्हा एकदा भयानक रूप घेतलं
होत.......आणि ती क्रिष्णा चा दिशेने ओरडत येऊ
लागली.....तो पर्यन्त कदम ने महाकाळ चा पोटावर जोरात लात
मारली.....दोघात जोरदार मारामारी होवू लागली......इकडे
मंजिरी क्रिष्णा ला जोरात धडक मारणार इतक्यात
ती कशाला तरी धडकली......एक वेगळच संरक्षण कवच
त्याचा भोवती होत......
क्रिष्णा ने हसत गळ्यातील रुद्राक्ष दाखवला.......त्या रुद्राक्ष
मुळेच ते कवच तयार झाल होत.....
मंजिरी भयानक चीत्कार करत हात पाय आपटू लागली......
इकडे कदम सोबतचा मारामारीत काठी हातातून खाली पडली......प्रता
परावांनी ती उचलली......आणि क्रिष्णा चा दिशेने फेकली.......क्रिष्णा ने ती पकडली.......मंजिरी आता शांत झाली होती......
महाकाळ ला कदम खूप मारत होते......,"खूप काली जादू येते
ना तुला.......तुझा अंगातील सगळी जादू बाहेर काढतो....."
"थांबा कदम..."क्रिष्णा बोलला....
कदम थांबले......महाकाळ खाली विव्हळत पडला होता.....
क्रिष्णा प्रतापराव कडे पाहत बोलला........,"
बोला तुमचा बायको सोबत...."
"मंजिरी....अग तुला नवीन आयुष्य दिल होत ना आम्ही तरी तू
या नराधमाची गुलाम कशी झालीस......"प्रतापराव बोलले.......
मंजिरी अगदी मूळ रूपावर आली आणि बोलली.....,"मला माफ
करा......माझा नाईलाज होता.....याचा प्रतेक आदेश माणन
मला गरजेचं होत......"
"अग पण का....??? प्रतापराव बोलले...
"कारण मी आई आहे......माझा बाळाचा आत्मा याचा ताब्यात
आहे.......त्या दिवशी हा हॉस्पिटल मध्ये आला आणि माझा पोटातील
आपल्या बाळाचं अर्भक घेऊन गेला.......आणि त्यानंतर त्याने
त्याचा आत्मा कैद केला.....आणि मला गुलाम केल....मला माफ
करा मी असहाय होते....."
"आणि त्या बाळाचा आत्मा या काठीत कैद आहे......."
क्रिष्णा बोलला......
"ही काठी म्हणजे तुमचं बाल समजून जाळल तर तुमचं आत्मा मुक्त
होईल......" क्रिष्णा बोलत होता......
"पण त्या आधी एक काम कारव लागेल तुम्हाला.....मा
झी आज्ञा ऐकावी लागेल....." क्रिष्णा मंजिरीचा जवळ जात
बोलला......
नंतर महाकाळ कडे पाहत बोलला....,"सुशील....तुझ कृत्य खराब होत
म्हणून तुला गावकर्यां नी शिक्षा केली होती.....पण तू
एका बाळाची आत्मा कैद करून तिचा आईला गुलाम
केलास.....आता ती आईच तुला शिक्षा करणार......"
"तुम्हाला हवी ती शिक्षा करा याला......"अस म्हणत क्रिष्णा ने
ती काठी जाळून टाकली........त्या सोबतच तिचा आत्मा मुक्त
झाला.....पण खरी मुक्ति तिला मिळणार होती ती सुशीलचा जीव
घेऊनच........
कदम,प्रतापराव आणि क्रिष्णा तिथून निघून गेले.......
सुशील उर्फ महाकाळ उठला आणि विनवणी करू लागला.....,"मला
माफ कर......जाऊ दे मला....मला नको मारूस...."
मंजिरी त्याचाकडे रागाने पाहत रडू लागली......रडण्याचा सुरू
वाढवला....आणि रडता रडता जोरात ओरडू लागली......
खूप भयानक आवाजात............त्या आवाजाने सुशील पण ओरडू
लागला.....त्याने डोळे बंद केले.....कान दोन्ही हाताचा तळव्याने
जोरात दाबू लागला.....त्याला तो आवाज सहन होत नव्हता.......पण
मंजिरीने सुरू आणखी वाढवला......त्याचा हाताचा जवळून कांनमधून
रक्त येऊ लागलं....रक्त स्त्राव वाढला.....त्याचा मेंदूचा सर्व
शिरा फुटत होत्या......आणि अचानक..........फट..........आवाज
झाला....आणि त्याचा डोक्याचा चिंधड्या उडाल्या......
एक मनुष्य रूपी जनावर मेला.......आणि मंजिरीचा आत्मा मुक्त
झाला.......
दुसर्या दिवशी क्रिष्णा बॅग खांद्यावर घेऊन चालला होता.....सोबत
कदम आणि प्रतापराव होते......
"माझी मंजिरी वाईट नव्हती,….." प्रतापराव बोलले....
"जाऊ द्या हो प्रतापराव......आता रिसॉर्ट चालू करा पुन्हा......"कद
म बोलले.....
"धन्यवाद क्रिष्णा तू होतास म्हणून हे सर्व ठीक झाल....."कदम
बोलले.....
क्रिष्णा हसत बोलला...,"अहो खरी कमाल तर तुम्हीच
केली.....एकदम सिंघम आहात तुम्ही....."
तिघे पण हसू लागले......तेवढ्यात बस आली.......क्रिष्णा बस मध्ये
जाऊन बसला....बस निघून गेली.......
प्रतापराव पुन्हा एकदा रिसॉर्ट चालू करणार होते........आणि
कदम.......कदम तर एक इंटरेस्टिंग काम करणार होते.....नर्स
ला भेटून......किती दिवस ते तरी सिंगल राहणार ना.......
इकडे बस मध्ये क्रिष्णा डोळे बंद करून झोपला होता.........अचानक
त्याला महाकाळ चे .शब्द आठवले.......जर त्याला त्याचा वारस
नाही भेटला....तर त्याचा आत्मा पिशाच्च बनतो........"

समाप्त........?????