Android app on Google Play

 

भुंगा

 

सकाळ झाली होती.....कालचा रात्रीत जे झालं ते फक्त मुक्या निसर्गाला माहीत होत......तो पण आता एकदम शांत होता.....वातावरण शांत होत.....आणि तिथे उभे असलेले लोक पण एकदम शांत उभे होते.......

पण एक पोलिस पथक पूर्ण जंगला मध्ये कसून शोध घेत होते....एक एक ठिकाण नीट निरखून पाहत होते.....पण पूर्ण जंगल तपासून पण त्यांना काहीच सापडलं नाही.......मग सर्व पथक एका जागी जमा झाले.....मजूर काही अंतरावर उभे राहून खूप आशेने पाहत होते......

"सर दोन वेळा पूर्ण जंगल तपासल....पण कुठेच काही सापडलं नाही..."
एक कौन्स्टेबल पुढे येऊन सल्युट करून बोलला.......

समोर पोलिस जीप होती.....त्याचा बोनेट वर इंस्पेक्टर झोपला होता.....जीप चा काचेला डोक टेकून डोळे बंद करून पडला होता......एक पाय खाली सोडून आणि दूसरा पाय त्या पायाचा गुढग्यावर ठेवला होता........तोंडावर ऊन लागू नये म्हणून पोलिस कॅप ने चेहरा झाकला होता.....
कॉन्स्टेबल काही वेळ थांबला आणि पुन्हा बोलला....."कदम सर...."
कदम ने पाय सरल केला....उठून बसले....कॅप डोक्यावर चढवली.....गॉगल लावला....आणि बोलले...,"इंटेरेस्टिंग......."

इन्स्पेक्टर कदम.......तिशीतील वय त्यांचं.....एकदम कडक शिस्तीचे.....दुसर्याोसाठी हा......त्यांचा कडे काही शिस्त नव्हती......रुबाबदार व्यक्तिमत्व......मजबूत शरीरयष्टी......मुंबई मध्ये  एंकाऊंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध होते....बर्या.च वेळा वरिष्ठांसी खटके उडायचे.......त्याचाच परिणाम म्हणजे काही दिवस आधी त्यांची इथे बदली झाली होती.......त्यांची ही पहिलीच केस होती......

हातातील छोटी काठी फिरवत ते मजुरांजवळ गेले आणि बोलले.....,"इंटेरेस्टिंग.......तुम्ही बोलताय जंगलात दोन खून झाले......तुम्हाला प्रेत पण दिसलं....."
गॉगल काढून एकाचा कॉलरला पकडून जवळ ओढल आणि आवाज चढवत बोलले.....,"पोलिसांना येडा समजतो ???.....खोट्या तक्रारी देतो...????."
तो मजूर थरथर कापू लागला.......आणि बोलला..,"साहेब...मा...माझ ऐका...."
कॉलर सोडत त्याला हलकासा धक्का देत कदम बोलले...."कदम फक्त एकाच ऐकतो.......
क्षणभर कदम थांबले....गॉगल चढवत बोलले.....,"स्वत:च....!!!."

"चला रे बसा गाडीत"...सर्व कोन्स्टेबलला त्यांनी फरमान सोडलं.....
आणि मजुरांकडे पाहत बोलले........,"लागा कामाला...."
सर्व पोलिस जीप निघून गेल्या....मजूर बिचारे गपचूप कामाला लागले......

इकडे कदमांनी आपली जीप प्रतापरावांचा वाड्यावर नेली......
"या या कदम साहेब.....या.."प्रतापरावांनी स्वत: पुढे येऊन त्यांचं स्वागत केल.....
कदमांनी पण हसत हसत त्यांचासी हात मिळवणी केली.....
"मजूर तुमचाकडे आल्या आल्या तुम्ही मला फोन करून सांगितलं म्हणून बर झालं मी लगेच माझी माणस पाठवून सगळं काम फत्ते करून घेतलं....."प्रतापराव बोलले....
"अहो आता पाण्यात राहायचं म्हटलं की मगरासोबत मैत्री करावी लागते..."कदम हसत बोलले...
"मग काही सापडलं का जंगलात...? कदम उत्सुकतेने बोलले.......
"हो....सापडलं...."प्रतापराव गंभीर आवाजात बोलले......
काही वेळ उठून उभे राहिले.....कदम त्यांचा कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते......
"मंगेश आणि धुला यांचं प्रेत सापडलं....
कदम उठून उभे राहिले आणि बोलले...,"इंटरेस्टिंग......."
पुढे ते बोलले...,"काय केल मग त्याच..."
प्रतापराव वळून त्याचा कडे पाहत बोलले...,"डॉक्टर कडे पाठवल आहे...पोस्ट मोर्टंम साठी.."
प्रतापरावांनी नोकराला खुणावल........नोकर आत गेला......
कदम बोलले....,"मजुरांना लावलं मी परत कामाला....आता काम नाही बंद करणार ते..."
नोकर बाहेर आला....त्याचा हातात नोटांचे बंडल होते.......
प्रतापरावांनी ते कदमचा हातात दिले आणि बोलले.....,"आमचा कडून छोटीशी भेट....तुम्ही होता म्हणून काम पुन्हा सुरू झालं..."
कदमानी ते घेऊन हळूच टोपीत घातल...आणि टोपी डोक्यावर चढवली.....
प्रतापराव पुढे बोलले....,"आमच ऐकत राहिलात तर अजून मिळतील..."
कदम हसत बोलले...,"मी फक्त एकाच ऐकतो.....स्वत:च....."
तेवढ्यात प्रतापरावांचा फोन वाजला......काही वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला.....आणि कदम कडे पाहत बोलले....,"डॉक्टर चा फोन होता....रीपोर्ट रेडी आहे....जाव लागेल..."
कदम बोलले...,"एवढ्या लवकर रीपोर्ट रेडी..? इंटरेस्टिंग......मी जातो पुढे आणि भेटतो डॉक्टर ला....तुम्ही पण तयार होवून या लगेच...."
एवढं बोलून कदम निघाले....
प्रतापराव मागून बोलले....,"कदम साहेब....रिसॉर्ट mhe....आपल स्वप्न आहे.....पूर्ण झालच पाहिजे....."
कदम बोलले...."तुमचं स्वप्न.....ते आमच स्वप्न..." आणि ते निघाले डॉक्टर कडे......
प्रतापराव पण तयार होवून मागे येणार होते....

इकडे कदम हॉस्पिटल मध्ये पोहचले....आणि विचारत विचारत पोस्ट मोर्तम रूम मध्ये आले....समोर काही अंतरावर डॉक्टर उभे होते....पुढे पाहून काही कामात व्यस्त होते......
"या इंस्पेक्टर कदम या...."डॉक्टर पुढे पाहतच बोलले....
कदम दचकलेच.....,"डॉक्टर मागे पण डोळे आहेत की काय तुम्हाला....??
डॉक्टर हसत हसत मागे वळले आणि बोलले..."नाही ओ कदम...पुढे आरसा आहे....त्यात दिसला..."
कदम हसले आणि बोलले...,"इंटेरेस्टिंग...."
"या थोड कामच बोलू......"अस बोलत डॉक्टर एका स्ट्रेचर जवळ गेले.....
त्या स्ट्रेचर वर पांढर्या. कपड्याने झाकलेली बॉडी होती.....जी रक्ताने काही जागी भिजली होती....
कदम स्ट्रेचर जवळ येऊन उभे राहिले.......डॉक्टर ने अचानक पूर्ण कापड ओढून बाजूला केल.....

समोर ची बॉडी ची अवस्था पाहून कदम दोन पावले मागे सरकले.......मंगेश ची बॉडी होती ती...
पोट पूर्ण फाटलेल....त्यातून लोंबांनार्याा आतडया.......डोळ्यातून....नाकातून....आणि तोंडातून रक्त बाहेर आल होत....चेहर्या.वर जखमा होत्या.....त्यातून आतल हाड दिसत होत....एका साइड चा बरगड्या मोडल्या होत्या.....
खांद्यापासून तोडलेला हात...तिथेच शेजारी ठेवला होता......
कदम काहीसं सावरून बोलले.....,"डॉक्टर....काय भयानक पोस्ट मोर्टम करता हो तुम्ही..."
डॉक्टर गंभीर आवाजात बोलले...,"अहो आम्ही या बॉडी ला हात सुद्धा लावला नाही.....पोस्ट मोर्तम करण्या सारखं काही राहिलाच नाही ना यात....अशाच अवस्थेत बॉडी मिळाली आम्हाला...."
कदम बॉडी निरखून पाहत बोलले...,"डॉक्टर काय वाटतय......कोणी मारल असेल याला......भुताने की हडळीने......"
त्यांचं हे वाक्य ऐकून दोघेही हसू लागले.......
डॉक्टर हसत बोलले....,"पोलिसांना पण जमत की जोक करायला......"
कदम पण हसत बोलले....,"नाहीतर काय.....मूर्ख मजूर म्हणत होते हडळीने जीव घेतलाय याचा......"
डॉक्टर बोलले...,"हडळीच तर माहीत नाही पण ते चोर असतील 7-8 जन तरी....आणि त्यांचा हातात शस्त्र पण असणार........त्याशिवाय पोट फाडणे आणि हात तोडणे शक्य नाही......मला तर वाटतय ती टोली खुपच भयानक असणार....."

कदम आता आतून थोडेसे घाबरले....तरीपण चेहर्याडवर न दाखवता बोलले....,"इंटरेस्टिंग...."
डॉक्टर बोलले...,"इंटरेस्टिंग तर दुसरी बॉडी आहे.....धुलाची...."
ते दोघे दुसर्याड बॉडी जवळ आले.....
कदम आता पण भयानक काही पाहायला मिळणार म्हणून पहिल्या पासून तयार होते....
डॉक्टर ने कपडा काढला.......आणि बोलले..,"याचा बॉडी ला कुठेच साधी जखम पण नाही.....फक्त चेहर्या वर जखमा आहेत त्या पण 3 दिवस आधीचा...."
कदम बोलले....,"मग हा मेला कसा...??
डॉक्टर बोलले....,"हार्ट अटॅक....
काही वेळ थांबून नजर तशीच कदम कडे ठेवून ते पुढे बोलले..."रीपोर्ट मध्ये पण हेच लिहावं लागणार पण हार्ट अटॅक का आला......त्याच वेगळं कारण आहे..."
कदम विचारात पडले आणि बोलले...,"इंटरेस्टिंग.........पण काय कारण आहे...??
डॉक्टर जवळचा कपाटाजवळ गेले आणि त्यातून दोन काचेचा बाटल्या काढल्या......
एका बाटलीत लाल रक्त दिसत होत...आणि त्यात अर्धी बुडलेली चॉकलेटी कलर ची वस्तु......आणि दुसर्या. बाटलीत
कोणतीतरी काली वस्तु होती...ज्याचा आकार हाताचा मुठी एवढा होता....

डॉक्टर ने ट्रे घेतला.....आणि .त्यात पहिल्या बाटलीचे झाकण काढून बाटली त्यात रिकामी केली.....आधी सर्व रक्त पडलं आणि नंतर एकदम ती वस्तु पडली.....ज्याने रकताचे काही थेंब कदमचा चेहर्याावर उडाले.....,"ओ डॉक्टर थोड सावकाश..."म्हणत त्यांनी रुमाल काढला आणि चेहरा पुसून घेतला.....

डॉक्टर काहीच नाही बोलले......जवळची सूरी उचलली आणि बोलले....,"हे धुलाच ह्रदय आहे...."
आता मात्र कदम डोळे मोठे करून त्या ह्रदयाकडे पाहू लागले......
डॉक्टरने ह्रदय एका हाताने पकडले आणि सुरीने ते मधोमध कापल.....कदम तोंड वाकड करून सर्व पाहत होते.....
ह्रदय कापल्या नंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला......कारण ह्रदय पूर्ण रिकाम होत......काहीच नव्हतं त्यात.....
कदम जवळ जात निरखून पाहत बोलले...,"इंटरेस्टिंग...........'
नंतर डॉक्टर कडे पाहत बोलले.......,"पण हे अस कस झालं....??
डॉक्टर काहीसा विचार करत दुसर्या बाटली कडे गेले आणि बोलले....,"याच उत्तर आपल्याला यात मिळेल...."
कदम त्या बाटलीकडे पाहत बोलले...,"आता हे काय आहे...??
डॉक्टर दीर्घ श्वास घेत बोलले....,"याला तुम्ही किडा पण बोलू शकता....किंवा पक्षी पण...कारण हा उडतो...आणि यानेच धुलाच ह्रदय पोकरून खाल्लंय.......मी तर याला भुंगा बोलेन.......शरीरातच सापडलं मला....मी लगेच बाटलीत बंद करून ठेवलं...'

कदम बोलले..,"एवढा मोठा भुंगा.....?? जो ह्रदय पोकरून खातो......??? इंटरेस्टिंग.........अशा केसेस तुम्ही आधी पाहिल्यात का…??
डॉक्टर बोलले...,"मी तर पहिल्यांदाच पाहतोय......"
कदम विचार करत बोलले....,"इंटरेस्टिंग........."
नंतर ती बाटली उचलत ते बोलले......,"हा भुंगा जीवंत आहे की मेलाय...?
अस म्हणत ते बाटलीचे झाकण उघडू लागले......
इतक्यात......"थांबा,कदम.......!!!

दारात प्रतापराव उभे होते.....त्यांनी कदम चा हातातून बाटली घेतली आणि झाकण आणखी घट्ट लावलं......आणि दोघांकडे करड्या नजरेने पाहत बोलले....,"हा भुंगा जोपर्यंत बंदिस्त आहे....तो पर्यन्त कोणाला काही धोका नाही....."
डॉक्टर तुमचाकडे जपून ठेवा याला आणि कोणाला उघडू देऊ नका......
कदम आणि डॉक्टर गोंधळून त्यांचाकडे पाहू लागले......
त्यांचे प्रश्नार्थी चेहरे पाहून प्रतापराव बोलले...,"वेळ आली की सांगेन सर्व....."
एवढं बोलून प्रतापराव निघू लागले.....कदम ही सोबत निघाले........
डॉक्टराने ती बाटली कपाटात जपून ठेवली आणि कपाट लॉक केल......आणि निघून गेले......
इकडे कपाटात त्या किडयाने अचानक डोळे उघडले.......
"खि खि खि खि खि..........हसण्याचा बारीक आवाज कपाटात घुमला.......
कदाचित तो स्वतहून बंदिस्त झाला होता.....आणि वाट पाहत होता रिसॉर्ट पूर्ण तयार होण्याची...........