Get it on Google Play
Download on the App Store

भाग ४

क्लिप्टनचे पाय जमिनीवर आहेत – तो निकोल्सनला विनवतो, "सर, रुग्णांनी काम करून मरणं आणि अधिकार्‍यांना कैदेत अन्न न मिळाल्याने मरण येणं, यापेक्षा त्यांनी काम केलेलं काय वाईट?"

पण निकोल्सन आपल्या भूमिकेवर ठाम, "माझ्या एकाही अधिकार्‍याला मजुरासारखं हीन दर्जानं  वागवलेलं मला चालणार नाही."

क्लिप्टन त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो," सर, आपण खूप दूर – हजारो मैल पसरलेल्या जंगलात अडकले आहोत. इथे सायटोचाच कायदा चालणार. तो म्हणेल ते करून दाखवेलच. आपल्या जिवाचं काही बरंवाईट झालं तर कोण विचारणार आहे आपल्याला? कृपा करून हट्ट सोडा. आता सायटोच्या दृष्टीनेही हा त्याचा आत्मसन्मानाचा प्रश्न बनला आहे. तुम्ही या भूमिकेत फर काळ राहू शकत नाहीत." तरीही निकोल्सन आपल्या तत्त्वावर ठाम!

पुलाचे काम पूर्ण करण्याची तारीख जवळ येते आहे. सायटो त्याच्या बांधकामात तज्ज्ञ अशा ले. म्यूरोकडून काम काढून घेऊन स्वतः नेतृत्व करू पाहतो. पण व्यर्थ! शेवटी नाईलाजाने क. निकोल्सनला कोठडीतून बाहेर काढून तो त्याची भेट घेतो. घनदाट अंधार्‍या रात्री; तरीही अंधाराला हजारो डोळे फुटलेले, सर्व सैनिक ही भेट पाहताहेत.

आपापला आब, ताठा राखत दोघांचे सवाल-जवाब होतात. निकोल्सन त्याला म्हणतो, "माझे दोन अधिकारी या कामात अत्यंत कुशल आहेत. आमचे सैनिक आमच्याच अधिकर्‍याच्या हाताखाली व्यवस्थित काम करतील." तो सायटोचे आव्हान स्वीकारतो-दिलेल्या चेळात पुलाचे काम पूर्ण करण्याचे! सायटोला नाईलाजाने ते मान्य करावेच लागते.

शरीराने दुबळा झालेला निकोल्सन लडखळत्या पावलांनी; पण ताठ मानेने बाहेर पडतो. ब्रिटिश यद्धकैद्यांत आनंदाचे वतावरण; तर अवमान झाल्याच्या दु:खाने सायटो वेडापिसा – धाय मोकलून एकांतात रडतो. सर्व अधिकार्‍यांची सुटका होते. मोठ्या जोमाने नियोजन सुरू होते; उपलब्ध साधनसामग्रीचे तसेच उपलब्ध मनुष्यबळाचे. आपल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत निकोल्सन म्हणतो, "आपल्या बटालियनला एकत्र बांधून, गूंतवून ठेवण्यासाठी ‘पुलाचे बांधकाम’ हे उद्दिष्ट साधन म्हणून वापरू."

पुलाची पाहणी होते, तेव्हा रिव्हच्या लक्षात येते की पूल फार ठिसूळ जमीन असलेल्या ठिकानी बांधला जातो आहे. त्यामुळे बांधकाम टिकत नाही. पुलाची जागा बदलली जाते. भक्कम एल्म वृक्षाचे भरपूर लाकूड जंगलात उपलब्ध असते. ते वापरायचे ठरते. युद्धकैद्यांमध्ये त्यांचा नेता परत आल्यने उत्साहाचे वातावरण-आता काम दुप्पट वेगाने सरू होते. सायटो आता त्रयस्थ नजरेने सगळीकडे लक्ष ठेवून आणि निकोल्सन पूल पूर्ण करण्याच्या ध्येयाने भारलेला!

अशाच एका क्षणी डॉ. क्लिप्टन आणि क. निकोल्सन यांच्यातील एक अविस्मरणीय संवाद – "सर शत्रूचा पूल इतक्या उत्तम पद्धतीने बांधायचा तुमचा आटापिटा कशासाठी?" क्लिप्टनच्या या प्रश्नावर निकोल्सन म्हणतो- "अरे तुला दिसत नाही का, आपल्या लोकांचं मनोधैर्य वाढलंय, शिस्त वाढलीय. त्यांची अवस्था सुधारलीय; ते आनंदात आहेत."

"ते खरंय सर, पण तरीही आपण जे काम करतो ती शत्रूशी हातमिळवणी तर ठरत नाही ना?"

"आपण युद्धकैदी आहोत. आपण काम नाकारू शकत नाही."

"ते खरंच सर, पण एतकं परिपूर्ण काम करायला हवंच का?"

"हे बघ क्लिप्टन तू एक डॉक्टर आहेस. इथे सायटोवर शस्त्रक्रिया करायची वेळ आली असती तर तू ती नीट केली असतीस, की त्याला मरू दिलं असतंस? आपली बटालियन आळसाने गांजून विखुरली गेली तर तुला कसं वाटेल? या लोकांना आपल्याला दाखवून द्यायचंय की धाकदपटशानं आपली शरीरं वा आत्मा ते नाही मोडू शकत. युद्ध एक दिवस संपेल; पण येणार्‍या भविष्यात लोक हा पूल वापरतील आणि आपली आठवण काढतील. कैद्यांनी नव्हे तर सैनिकांनी केलेलं नेटकं काम म्हणून – ब्रिटिश सैनिकांनी युद्धकैदी असतानाही केलेलं काम!"

क. निकोल्सनचे हे परिपक्व विचार थक्क करणारे!

तिकडे सुरूवातीला पळून गेलेला कमांडर शिअर्स हा आता सिलोनला हॉस्पिटलात आराम करतो आहे. तेथील Force-316 या दोस्त राष्ट्रांच्या बटालियनचा प्रमुख मेजर वॉर्डन याला त्याची माहिती कळते. शिअर्स खरं तर कमांडर नाहीच. बोट बुडाल्यानंतर क. शिअर्स मृत्युमुखी पडलेला. त्याचे नाव धारण करून सायटोच्या कँपवर तो सवलती मिळवण्याचा प्रयत्न करतो; पण व्यर्थ! मात्र, पुढेही त्याने हेच सोंग चालू ठेवलेले असते. Force-316 ला पूलबांधणीचे चलू असलेले काम उद्ध्वस्त करायचे आहे. खरे तर निकोल्सनही त्यांच्यातलाच; पण शिस्त म्हणून, नियमाचे पालन करायचे म्हणून, पुलाच्या उभरणीत सर्वस्व ओततोय आणि त्या पुलाचा वापर करून जपानी सर्वत्र हातपाय पसरतील म्हणून त्याच्याच वरिष्ठांच्या आज्ञा आहेत. घनदाट जंगलातील तो कँ नं. १६ – शिअर्स येथे राहून आलेला, पळताना तेथील आदिवासींशी दोस्ती झालेला. त्यालाच वाटाड्या करायचे ठरते.

मे. वॉर्डन, कमांडर शिअर्स, उत्तम पोहणारा जोईस हे त्रिकूट या कामावर निघतं. पॅराशूट्च्या साहाय्यानं जंगलात उतरणं, रातोरात झाडं तोडत नदी पार करणं, वाटेत जळवा, जंगली साप भेटतातच; पण आता थोडा वेळ उरलेला. धुवांधार पाऊस पडत असतो. पहिली गाडी येण्याच्या क्षणी पूल उअडवायचाच! सगळे अहोरात्र वाटचाल करताहेत…

इकडे पुलाचं काम पुरं होत आलं आहे; पण तरी ठरलेल्या वेळात काम पूर्ण होणं अवघड वाटू लागलं आहे. अधिकार्‍यांना हमाली काम करण्याची सक्ती होऊ नये म्हणून सुरुवातीला तत्त्वासाठी झगडणार्‍या निकोल्सनचे अधिकारी आपणहून काम करायचं ठरवतात; एवढंच काय रुग्णालयातले रुग्ण्ही मदतीला सज्ज होतात. यथाशक्य सर्वांच्या प्रयत्नांतून साकार होतो तो अतिशय देखणा, मजबूत असा पूल!

वाटेत मे. वॉर्डन जखमी होतो. सर्वांची चाल मंदावते; पण त्याला सोडून पुढे जाण्याची आज्ञा क. शिअर्स मानत नाही. बिकट वाटेने धबधब्याच्या अंगाने चढत ते नियोजित स्थळी पोहोचतात. वॉर्डन आणि शिअर्स मधील संवदही खूप बोलका आहे.

शिअर्स म्हणतो, "तो निकोल्सन एक वेडा. तुम्ही दुसरे! नियमांवर, शिस्तीवर तुमचं एतकं प्रेम की त्यासाठी तुम्ही मरायलाही तयार व्हाल. पण त्यापेक्ष माणसारखं जगावं हे महत्त्वाचं नाही का? मी तुम्हाला मरु देणर नाही मेजर, तुमचे नियम बियम मल माहीत नाहीत. आपण एकत्रच वाटचाल करू; जगू किंवा मरू." (इथे एक गोष्ट मला आवर्जून नमूद कराचिशी वाटते- माणसानं सिंहासारखं जगावं किंवा आणखी कोणासारखं जगावं असे अनेक लेखक लिहितात. पण माणसानं माणसारखं किंवा स्वतःसारखं जगावं असे क्वचित सांगतात.)