भाग १
हिंदी चित्रपटसृष्टी (Bollywood) आणि Hollywood चित्रपटसृष्टी यांची तुलना करणे कठीण असं म्हणण्यापेक्षा ते गैरवाजवी ठरेल! कारण Bollywood मध्ये वर्षात आठशेवर चित्रपट प्रदर्शित होत असले तरी चित्रपटाच्या लायकीला उतरणारे हाताच्या बोटावर मोजण्यसारखे असतात. त्यबाजुने Hollywood मध्ये वर्षिक ३०० ते ४०० चित्रपट निघतात. पण त्यतील बहुतेक चित्रपट कलात्मक असल्यामुले प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात आणि म्हणूनच त्यांच्या पसंतीला उतरतात.
काही अपवाद वगळता चित्रपट कथा, अभिनय, background effects, special effects यांतही Bollywood चित्रपट Hollywood चित्रपटांपेक्षा खूप मागे आहेत. माझ्या एका मित्राने म्हटल्याप्रमाणे – Hollywood चित्रपटांत गाणी न घुसवता त्यांचा एक album release केला जातो; तसंच Bollywood चित्रपटात गाणी दाखविण्यापेक्षा त्यांचा एक album करावा. Bollywood चित्रपट बहुतेक एकाच theme वर आधरलेले असल्याकरणाने प्रेक्षकांच्य ह्रदयाचा ठेका चुकवू शकत नहीत. तरीही Bollywood चित्रपटांचा व्यवसाय ठीक चालतो.
हा चित्रपट पाहिल्यावर माझ्या मनात उत्स्फुर्तपणे खालिल विचार आले-
माणूस किती वर्षं जगला यापेक्षा तो कशाप्रकारे जगला यला महत्त्व आहे. स्वतःसाठी जगला तो मेला, दुसर्यांसाठी जगला तो जगला.
Once a great player comes
To write against your name;
Not whether you lost or won
But how you played the game!