Android app on Google Play

 

वायुपुराणातील श्लोक

 


इदम् हैमवतं वर्षं भारतं नाम विश्रुतम्। हेमकूटं परं तस्मात् नाम्ना किम्पुरुषं स्मृतम्॥
नैषधं हेमकूटात् तु हरिवर्षं तदुच्यते। हरिवर्षात् परञ्चैव मेरोश्च तदिलावृतम्॥
इलावृतात् परं नीलं रम्यकं नाम विश्रुतम्। रम्यात् परं श्वेत विश्रुतं तत् हिरण्मयम्॥
हिरण्मयात् परं चापि शृंगवांस्तु कुरुः स्मृतम्।

वायु पुराणात सापडणाऱ्या या श्लोकानुसार आता  काही उहापोह करूया...

  • हेमवत म्हणजे भारत देश हे आता आपल्या ध्यानात आले असेलच (संदर्भासाठी ३ रे प्रकरण वाचा)

  • त्याच्या पलीकडे   हेमकूट पर्वत आहे. या प्रदेशाला किम्पुरुश असेही म्हणतात.कविकुलभूषण कालिदासाचे संस्कृत नाटक अभिज्ञान शाकुंतल मध्ये  मारीचाश्रम हेमकुट पर्वतात स्थित असल्याचा उल्लेख आहे जेथे दुष्यंताला शकुंतलेशी केलेल्या गंधर्व विवाहात उत्पन्न पुत्र सर्वदमन भेटतो. बाणभट्ट लिखित कादंबरी २ मध्ये देखील हेमकुट पर्वत प्रदेशात चंद्र्पीडा आणि कादंबरी यांचे मिलन झाल्याचा उल्लेख आहे.

  • त्यानंतर नैषध प्रदेश आहे ज्याला हरीवर्ष असे म्हणतात. राजा नळ याच प्रदेशातला म्हणजे हा प्रदेश दख्खनच्या आसपास असावा  
  • हरीवर्षाच्या पुढे मेरू पर्वत आहे. ज्याला इलावृत्त असेही म्हणतात  हिंदू, जैन व बौद्ध पुराणकथांनी मेरूला विश्वाच्या केंद्रस्थानी वा पृथ्वीच्या नाभिस्थानी मानले आहे. म्हणूनच माळेच्या मध्यमण्याला लक्षणेने ‘मेरूमणी’ म्हणतात. विविध पुराणकथांच्या मते जंबू वगैरे द्वीपेकमळाच्या पाकळ्यांप्रमाणे त्याच्या भोवती आहेत. सूर्य, चंद्र व इतर ग्रह त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. त्याची उंची ८५ हजार योजने आहे. त्याच्या शिखरावर स्वर्गीय गंगा उतरते. त्याच्या शिखरावर ब्रह्मदेवाची नगरी असून उतारावर इंद्रादी अष्ट दिक्‌पालांच्या नगरी आहेत. तेथे देव, गंधर्व, सप्तर्षी इत्यादींचे वास्तव्य असते. रावणाची लंका हे मूळचे मेरूचेच एक शिखर होय. तो स्वर्गाला आधार देतो. त्याच्या खाली सप्तपाताल लोक असून त्यांच्या खाली विश्वाचा आधार वासुकी आहे. पांडवांचा अखेरचा प्रवास मेरूच्या दिशेने झाला. ‘मेरूसावर्ण’ व ‘मेरूसावर्णि’ या नावाच्या विशिष्ट मनूंनी या पर्वतावर तप केले होते. मेरूच्या अकरा कन्यांपैकी मेरूदेवी ही नाभिराजाची पत्नी व जैनांचे आद्य तीर्थकार ऋषभनाथ किंवा आदिनाथ यांची माता होती. मेरूव्रत नावाचे जैनांचे एक व्रतही आहे. सोने, चांदी इत्यादींचा प्रतीकात्मक मेरू करून तो दान देण्याचे हिंदूंचेही एक व्रत आहे.
  • मेरू पर्वताच्या पुढे नीलवर्ष  किंवा रम्यकवर्ष  प्रदेश आहे. जेथील राजा मनु होते आणि मत्स्यापुजक होते. सध्याचा इटली म्हणजे रम्यकवर्ष असे म्हणतात.  तो कसा ते खालीच नकाशा पाहून आपण अंदाज लावू शकतो 

  • त्यांच्या पलीकडे श्वेतप्रदेश किंवा हिरण्मय आहे 

  • हिरण्मय च्या पलीकडे श्रुन्गवान किंवा कुरु प्रदेश आहे 


  • अशाप्रकारे वायुपुराणात वर्णन केल्याप्रमाणे हे सात मुख्य देश होते तर ब्रम्हांड पुराणातील वर्णनाप्रमाणे सर्वात उत्तरेकडील प्रदेश म्हणजे कुरु प्रदेश होय.


उत्तरस्य समुद्रस्य समुद्रान्ते च दक्षिणे। 

कुरवः तत्र तद्वर्षं पुण्यं सिद्ध-निषेवितम्॥


अर्थात हा कुरु प्रदेश उत्तर समुद्राच्या दक्षिण दिशेल वसला आहे जेथे सिद्ध पुरुष वास करतात. वरील नकाशा पाहिलात कि कल्पना येईल कि आपण जे प्रदेश परदेश म्हणून आज पाहतो ते मुळात आपल्याच देशाचा भाग होते. भौगोलिक बदलामुळे याबद्दलचे ज्ञान पुसले गेले.