Get it on Google Play
Download on the App Store

संगत

आपण नेहेमी नकारात्मक लोकांच्या संगतीत राहतो का.. कोणाशी बोलुन ती व्यक्ती निघून गेल्यावर अचानक आपल्याला मरगळ, उदासी, दुःखी, एकटं, किंवा depress वाटतं का.. तसं असेल तर आपली ऊर्जा त्या व्यक्तीने नकळत शोषून घेतलेली आहे.  जवळच्या नात्यात अशी व्यक्ती असेल किंवा अशा व्यक्तींशी टाळता येत नाही असा रोजचा संबंध येत असेल तर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या negative emotions ना बढावा देऊ नका, त्यांच्या बरोबर त्यांचं दुःख हलकं करताना तुम्ही रडू नका..  किंवा दुःखाशी स्वतःला relate करू नका. नाहीतर तुमची ऊर्जा ते नकळत शोषुन घेतील आणि तुमच्याशी बोलून गेल्यावर त्यांना खूप बरं वाटलं आणि तुम्ही मात्र down व्हाल. 

काहीवेळेस आपण काही समूहांशी विविध कारणांनी जोडलेले असतो. यात फेसबुक वरचे virtual समूह सुद्धा आले बरं का. 
जर समूहात काही लोकं नकारात्मक विचार प्रसारित करत असतील, किंवा सतत बोलत असतील तरीही सावध.   अमेरिकेत तिथल्या निवडणुकीनंतर राष्ट्राध्यक्षां विरुद्ध असे खूप virtual आणि प्रत्यक्ष समूह बनवले गेलेत. आपला त्यावर चांगले किंवा वाईट बोलण्याचा विषय नाही. पण Mass influence खाली येऊन लोकं अप्रत्यक्ष पणे ही नकारात्मकता स्वताच्या आयुष्यातही आमंत्रित करतात हे त्यांना समजतच नाही.

आपल्या मनात विचार हे  बाहेरील विचारविश्वामधून येत असतात.. आपल्याला वाटलं की मी हा विचार केला तरी आपण ज्या vibrations वर आहोत त्यांच्याशी मिळतेजुळते विचार आपल्या पर्यंत बाहेरून येतात आणि आपण ते ग्रहण करत असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक संगतीत राहिलात, तर कुठले विचार घ्याल हे तुम्हीच ठरवा. 

पूर्वीं लोकं यासाठीच म्हणत "सुसंगती सदा घडो".