Get it on Google Play
Download on the App Store

सकारात्मक विचार

ईश्वराने माणसाला विचार करण्याची फार मोठी शक्ती दिली आहे ज्याने तो आपल्या जीवनाचं शिल्पं हवं तसं घडवू शकतो. पण बहुतेक वेळा आपण ही शक्ती नकारात्मकते मधे वाया घालवतो.  घडणाऱ्या घटना, आजूबाजूची माणसं, किंवा बाह्यपरिस्थिती कशीही असली तरी आपण बाह्य जग बदलू शकत नाही. आपण फक्त स्वताला बदलू शकतो.  सकारात्मक विचारांनी  तुमचं तेजोवलाय नुसतं शुद्धच होत नाही तर ते अधिकाधिक strong होत रहातं आणि त्याला natural protection मिळत राहात.  हा माझा स्वतःचा अनुभव आहे, की समोरची माणसं त्यांच्या विचारातून, बोलण्यातून कितीही नकारात्मकता तुमच्यावर फेकत असली, तरी तुमच्या सकारात्मक विचारां मूळे,  तुम्ही त्याने प्रभावित होत नाही.  सततच्या सकारात्मक (positive) विचारां मुळे बाह्य परिस्थिती सुद्धा हळूहळू बदलत जाते.