इस्रोचे जागतिक स्थान
अमेरिका, रशिया, फ्रांस, जपान, चीन सह भरत जगातील त्या ६ देशांमध्ये समाविष्ट आहे ज्यांच्यात आपल्या भूमीवर उपग्रह बनवण्याची आणि ते अंतराळात सोडण्याची क्षमता आहे. भारतासाठी ८६ उपग्रह अंतराळात सोडण्या बरोबरच इस्रो ने आतापर्यंत २१ वेगवेगळ्या देशांसाठी देखील ७९ उपग्रह लॉंच केलेले आहेत. आर्यभट्ट हा इस्रोच पहिला उपग्रह आहे जो १९ एप्रिल १९७५ रोजी रशियाच्या मदतीने अंतराळात सोडण्यात आला होता.