ISRO (इस्रो)
ISRO (इस्रो) चा full form आहे "Indian Space Research Organization" (भारतीय अंतराळ संशोधन संस्था). याचे मुख्य कार्यालय (हेड ऑफिस) बेंगलोर मध्ये आहे आणि ते अंतराळ विभागाद्वारे कंट्रोल केले जाते जो थेट भारताच्या पंतप्रधानांना रिपोर्ट पाठवतो. भारतात इस्रोची एकूण १३ केंद्र आहेत. इस्रो ची स्थापना डॉ. विक्रम साराभाई यांनी सन १९६९ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केली होती. त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक देखील मानले जाते.