सुलतानाचे चित्तोडवर आक्रमण
जेव्हा सुलतानाला समजले की त्याची यजना फसली आहे, सुलतानाने रागाच्या भारत आपल्या सैन्याला चित्तोडवर आक्रमण करायचा आदेश दिला. सुलतानाच्या सैन्याने किल्ल्यात घुसण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु त्यांना यश आले नाही. आता सुलतानाने किल्ल्याला वेध देण्याचा निश्चय केला. हा वेध इतका मजबूत होता, की किल्ल्यातील खाद्य शिबंदी हळू हळू समाप्त झाली. शेवटी रतन सिंहाने किल्ल्याचे महाद्वार उघडण्याचा आदेश दिला आणि तो बाहेरील सैन्याशी लढता लढता वीरगतीला प्राप्त झाला. हे ऐकताच पद्मिनीच्या लक्षात आले की आता सुलतानाचे सैन्य चित्तोडच्या सर्व पुरुषांना मारून टाकेल. आता चित्तोडच्या स्त्रियांच्या समोर दोनच पर्याय होते, एक तर विजयी सेनेच्या हवाली जाऊन आपला निरादर, विटंबना सहन करणे किंवा मग जोहार साठी सिद्ध होणे.