संगीतकार राघव चेतन
त्या वेळेस चित्तोड वर राजपूत राजा रतन सिंह याचेक राज्य होते. एक आदर्श शासनकर्ता आणि पती असण्याच्या सोबतच रतन सिंह संगीताचा संरक्षक देखील होता. त्याच्या दरबारात कित्येक प्रतिभाशाली लोक होते ज्यात संगीतकार राघव चेतन देखील एक होता. राघव चेतनच्या बाबतीत लोकांना एक गोष्ट माहिती नव्हती ती म्हणजे तो एक जादुगार देखील होता. तो आपल्या या वाईट प्रतिभेचा उपयोग शत्रूला मारण्यासाठी करीत असे. एक दिवस राघव चेतनचे वाईट आत्म्यांना बोलावणे रंगे हात पकडले गेले. ही गोष्ट समजताच रावल रतन सिंहाने क्रुद्ध होऊन त्याचे तोंड काळे केले आणि गाढवावरून धिंड काढून त्याला आपल्या राज्यातून निर्वासित केले. रतन सिंहाने केलेल्या या कठोर शिक्षेमुळे राघव चेतन त्याचा कायमचा शत्रू बनला. सूडाच्या अग्नीने पेटलेला राघव चेतन अल्लाउद्दिन खिलजीकडे गेला!