Android app on Google Play

 

शांती सौन्दर्यराजन

 

शांती सौन्दर्यराजन

हि एक भारतीय धावपटू होती. शांती अत्यंत गरीब परिस्तितीत जन्माला आली होती. तिने आयुष्यांत एकही दिवस ३ वेळ जेवण घेतले नव्हते. इयत्ता आठवीत तिने काही शालेय स्पर्धेत इतका जर्बदास्त परफॉर्मन्स दिला कि शाळेने खुश होऊन तिला शिष्यवृत्ती आणि ३ वेळचे जेवण द्यायला सुरुवात केली. शांती अचानक भारतीय धावपटू मधील शान बनली.

२००५ मध्ये दक्षिण कोरिया मध्ये तिने आशियाई ऍथलिट गेम्स मध्ये तिने रौपय पदक मिळवले. २००६ मध्ये आशियाई गेम्स मध्ये तिने ८०० मी शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. पण कुणी तरी तक्रार दिल्याने तिला लिंग चाचणीला सामोरे जावे लागले आणि त्यातून तिला "स्त्री नाही" असे घोषित करण्यात आले. हा निष्कर्ष काढण्यासाठी स्त्री-रोग-तज्ञ्, मनोविकार तज्ञ्, जनुकीय अभ्यास तज्ञ्, हार्मोन तज्ञ् आणि अंतर्गत अवयव तज्ञ् ह्यांनी तिच्यावर अभ्यास केला. भारतीय डॉक्टरांच्या मते लहानपणापासून चांगले पोषण ना मिळाल्याने तिची अशी परिस्तिथी झाली असावी. नंतर शांतीने स्वतःहून जाहीर केले कि ती Androgen insensitivity syndrome ह्याने पीडित आहे. ह्या रोगांत गर्भांत असताना हा विकार निर्माण होतो. मूल वाढत असताना पुरुषीय लिंगाची वाढ पूर्णपणे थांबते पण स्त्री लिंगाची वाढ मात्र त्या मुलांत होत राहते. अश्या प्रकारची व्यक्ती बाहेरून सुमारे ९०% स्त्री वाटली तरी तिच्या आंत अंडाशय इत्यादी भाग असतातच असे नाही.

दुःखी होऊन शांतीने नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  एक मित्राने तिला हॉस्पिटल मध्ये पोचवून वाचवले. तामिळनाडू सरकाने मात्र तिचे पुनर्वसन करण्यासाठी पावले उचलली करुणानिधी सरकारने तिला एक टीव्ही आणि १५ लाख रुपये दिले. जयललिता ह्यांनी सुद्धा तिला मदत केली. आज तिची स्वतःची अकादमी असून सुमारे ७० मुलांना ती विनामूल्य खेळाचे धडे देते.

शांतीचे उदाहरण अश्या साठी दिले आहे कि LGBTQ लोक आपल्यासारखेच माणूस असतात आणि आपल्या प्रमाणेच त्यांना त्यांची स्वप्ने असतात आणि ती प्राप्त करण्याची ताकद सुद्दा असते. त्यांना हीं भावनेने किंवा वाईट दृष्टिकोनाने पाहण्याऐवजी आम्ही त्यांना आवश्यक ती मदत केली पाहिजे.