Android app on Google Play

 

समलिंगी संबंध म्हणजे काय ?

 

एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमधील लैंगिक आकर्षण व समागम असण्याला समलैंगिकता' (इंग्लिश: Homosexuality) म्हणतात. जी व्यक्ती केवळ स्वतःच्या लिंगाच्या इतर व्यक्तींबद्दल लैंगिक आणि अ-लैंगिक प्रणयदृष्ट्या आकर्षित होते अश्या व्यक्तीस 'समलैंगिक' अथवा 'समलिंगी' (इंग्लिश: Homosexual) म्हणतात. (सम + लिंग->लैंगिक + ता ; संस्कृत घटकांपासून शब्दसिद्धी) समलैंगिकता म्हणजे समान लिंगाच्या वा लिंग-ओळखीच्या व्यक्तींमध्ये शृंगारिक वा शारिरिक आकर्षण, वा लैंगिक संबंध. अंतर्गत दिशा म्हणून समलैंगिकतेचा संदर्भ येणेप्रमाणे : "बहुतेक वा पूर्णतः समान लिंगाच्या व्यक्तींकडे लैंगिक, शृंगारिक वा भावनिक आकर्षणाचा वा अनुभवांचा स्थायी कल वा वर्तनबंध". शब्दाचा आणखी एक संदर्भ म्हणजे "असे आकर्षण, ते आकर्षण अभिव्यक्त करणारी वागणूक, वा आकर्षण आणि वागणूक असलेल्या समाजात सहभाग, यांच्यावर आधारित व्यक्तिगत किंवा सामाजिक ओळख".

समलिंगी संबंध म्हणजे काय?
समलिंगी (होमो सेक्शुअल) ही नैसर्गिक अवस्था म्हणता येऊ शकते. ७ ते १४ या वयात ती जन्माला येते. या वयात येणार्‍या काही जणांना समलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटू शकते. ते शरीरसुखाच्या संदर्भात असतं असं नाही; पण आपल्यासारख्याच दिसणार्‍या, आपल्याच वयाच्या (किंवा त्याहून मोठय़ाही) व्यक्तीचं आकर्षण या वयात अत्यंत स्वाभाविक. याच वयात मुलं-मुलं/मुली-मुली अशी घट्टमुट्ट मैत्री व्हायला लागते. हे सगळं त्या वयात शारीरिक, मानसिक वाढीसाठी पूरक-पोषकच असतं. त्यात ‘सेक्स’ अभिप्रेत नसतो, त्याची जाणीवही पुसटशी असते; पण आकर्षण वाटतं ते मात्र फक्त समलिंगी व्यक्तींचंच! मात्र काही जण याच अवस्थेत अडकून पडतात. जन्मभर या अवस्थेत तरी राहतात, नाहीतर काही काळाने बायसेक्शुअल अवस्थेत जातात. समलिंगी शरीरसंबंध निर्माण होतात. कारण ही अवस्था संपत नाही.

समलिंगी संबंध म्हणजे काय?
समलिंग असणार्‍या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना समलिंगी संबंध असे म्हणतात. समान लिंगी व्यक्तींचे म्हणजे स्त्री-स्त्री अथवा पुरुष-पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध.

गे आणि लेस्बियन असणे म्हणजे काय?
पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना ‘गे’ म्हटले जाते. पुरुषाला फक्त पुरुषाचंच आकर्षण असणं व पुरुषाला फक्त पुरुषाशीच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणं अशा पुरुषांना ‘गे’ म्हटलं जातं. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना ‘लेस्बियन’ म्हटलं जातं. अशा स्त्रियांना फक्त स्त्रियांचंच आकर्षण वाटतं. स्त्रियांबरोबरच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते.

समलैंगिक असणं अनैसर्गिक आहे का?
समलिंगी असणं नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक अग्रक्रम असतात. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं. म्हणजेच तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटतं, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावंसं वाटतं याचा अर्थ तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो.

समलैंगिक असणं ही विकृती किंवा आजार आहे का?
समलैंगिकतेकडे कल असणं ही विकृती नाही. हे नैसर्गिक आहे. आणि हा कुठलाही आजार नाही. ही एक शरीराची व मनाची अवस्था आहे. जसं पुरुषाला स्त्रीचं आकर्षण वाटणं, स्त्रीला पुरुषाचं आकर्षण वाटणं, त्यांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटणं हे नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे स्त्रीला – स्त्रीचं, पुरुषाला – पुरुषाचं आकर्षण वाटू शकतं. समान लिंगाच्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवण्याकडे कल असू शकतो. मात्र, भारतीय समाजाने अशा संबंधांना मान्यता दिलेली नसल्यामुळे त्याकडे विकृती म्हणून बघितलं जातं. समलिंगी संबंध ठेवणारे अनेक स्त्री-पुरुष समाजात आहेत. पण अशा नात्याला कायद्यानेही मान्यता नसल्याने पुढे येऊन आपले लैंगिक अग्रक्रम मान्य करणं त्यांना अवघड जातं.

समलिंगी संबंध ठेवण्यामागे इतर कारणे?
पौगंडावस्थेत आणि तारुण्यात जी मुलं समलिंगी संबंधात अडकतात त्याला जबाबदार अनेकदा आजूबाजूचं वातावरण असतं. काही मुलांची शरीरधारणा हेट्रोसेक्शुअलच असते; पण केवळ मानसिक-भावनिक आधार शोधण्यासाठी ही मुलं समलिंगी संबंधांचा आधार घेतात. किंवा अनेकदा महाविद्यालयीन दिवसात लैंगिक आयुष्यात निरनिराळे प्रयोग करून बघण्याची इच्छा बळावते आणि अशावेळी समलिंगी व्यक्तीबरोबर लैंगिक प्रयोग करून बघणं त्यांना कमी धोकादायक वाटतं.

Source: loksatta: http://www.loksatta.com/desh-videsh-news/everything-about-homosexuality-301854/