कल्याणजी - आनंदजी
कल्याणजी वीरजी शाह आणि आनंदजी वीरजी शाह ह्या गुजराती बंधूंच्या जोडगोळीने हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक जबदस्त गाणी दिली (30 June 1928-03 November 2000). ७० च्या दशकांत कल्याणजी आनंदजींनी अनेक जबरदस्त गाणी चालबद्ध केली. डॉन, सरस्वतीचंद्र. बैराग, त्रिदेव, कुर्बानी, आणि सफर चित्रपटातील त्यांची गाणी विशेष गाजली.
कच्च प्रदेशातील एका गुजराती व्यापाऱ्याने मुंबईत स्थलांतर केले. किराणा मालाचे त्यांचे छोटे दुकान होते. कल्याणजी आनंदजी हि ह्या व्यापार्याची मुले होती. मुंबईतील गिरगाव भागांत फुकट अन्नाच्या बदल्यांत एक संगीत शिक्षकाने ह्यांना संगीताचे धडे दिले. ह्या मुलांचे आजोबा गुजराती लोकसंगीताचा अभ्यास असलेले गायक असल्याने कदाचित ह्यांच्या रक्तांत संगीत आधीपासून होते.
Claviolin हे वाद्य वाजवत कल्याणजीनी आपले संगीत क्षेत्रांतील स्थान प्राप्त केले. हे व्हायोलिन "नागीण पुंगी" च्या आवाजासाठी वाजवले जाते. १९५४ मध्ये हेमंत कुमार ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या नागीण चित्रपटात त्यांनी हे वाद्य वाजवले. आनंदजी ह्यांनी भारतातील सर्वांत पहिला ऑर्केस्ट्रा आनंदजी वीरजी शाह आणि पार्टी बनवला.
कल्याणजी आनंदजी ह्यां संगीतकार म्हणून मुंबईतील चित्रपट सृष्टीत प्रवेश केला तेंव्हा मदन मोहन, सचिन बर्मन, हेमंत कुमार, नौशाद, शंकर जयकिसन आणि रवी हे आधीपासूनच चित्रपट सृष्टी गाजवत होते. ह्या बड्या नावांत कल्याणजी आनंदजी ह्यांनी अतिशय सहजपणे आपले स्थान प्राप्त केले ह्यावरून त्यांचे संगीत किती चांगले होते हे लक्षांत येते.
कल्याणजीनी १९५९ साली सम्राट चंद्रगुप्त ह्या चित्रपटातील `चाहे पास हो` (रफी लता) ह्या गाण्याला सर्वप्रथम चाल दिली. निव्वळ संगीताच्या जोरावर चित्रपट गाजला. पोस्ट बॉक्स ९९९ ह्या दुसऱ्या चित्रपटाला कल्याणजी ह्यांनी संगीत दिले आणि त्यानंतर त्याच्या भावाने म्हणजे आनंदजींनी त्यांची साथ द्यायला सुरुवात केली. सट्टा बाजार, मदारी, छलिया ह्या चित्रपटांतील त्यांची गाणी तुफान गाजली.
कल्याणजी आनंदजी ह्यांचे संगीत एक वेगळ्या पठडीतील होते. इतर संगीतकाराप्रमाणे त्यांच्या चाली नेहमीच्या राग आधाराची चाळीपासून फारकत घेत होत्या तसेच अनेक विविध प्रकारची वाद्ये त्यांनी आपल्या संगीतात वापरायला सुरुवात केली. त्यांनी २५० चित्रपटांना संगीत दिले ज्यातील १७ चित्रपटांनी गोल्डन जुबली आणि ३९ चित्रपटांनी सिल्वर जुबली केली. दोन्ही भाऊ अतिशय समाजसेवी वृत्तीचे होते आणि त्यांनी देश विदेशांत विविध सामाजिक कार्यासाठी विनामूल्य कन्सर्ट केले. अमिताभ, अनिल कपूर, दिलीप कुमार, विनोद खन्ना इत्यादी लोकांनी सुद्धा ह्यांत खूप हातभार लावला.
ह्यांनी चित्रपट सृष्टीला फक्त संगीताचं नाही दिले तर अथक परिश्रम घेऊन त्यांनी अनेक संगीतातील हिरे शोधून त्यांना प्रसिद्धी दिली. मनहार उधास, कुमार सानू, अलका याग्निक, उदित नारायण, सपना मुखर्जी, सुनिधी चौहान ह्या सर्वाना त्यांनीच शोधून काढले. लक्ष्मीकांत प्यारेलाल हे संगीतकार म्हणून प्रसिद्ध होण्याच्या आधी कल्याणजी आनंदजी ह्यांचे असिस्टंट म्हणून काम करत होते.
संगीत लेखनाच्या क्षेत्रांत कमल जलालबादि, आनंद बक्षी, गुलशन बावरा, अंजान, वर्मा मलिक इत्यादींना त्यांनीच मोठे ब्रेक दिले.
कल्याणजी आनंदजी ह्यांच्या संगीताची चोरी काही अमेरिकन संगीतकारांनी केली. ब्लॅक आय पिया, ह्यांच्या सांगिताला अमेरिकेत ग्रॅमी अवॉर्ड मिळाले.
२४ ऑगस्ट २००० मध्ये कल्याणजीनी शेवटचा श्वास घेतला. आनंदजी लिटल स्टार्स नावाने लहान मुलांना संगीताचे धडे देण्याचे काम आज सुद्धा करत आहेत.
काही गाजलेली गाणी :
जिस पथ पे चला (यादगार)
वादा करले सजाना
दिल तो दिल है
जा रे जा ओ हरजाई
मेरे अँगने में
एक तारा बोले
ओ साथी रे
अपनी तो जैसे तैसे
दम दम डिगा डिगा
फूल तुम्हे भेज है खत में
जीवन से भरी तेरी आँखे
पल पल दिलके पास
नीले नीले अम्बर पर