Android app on Google Play

 

ओम प्रसाद नय्यर

 

ओम प्रसाद नय्यर ह्यांचा जन्म 16 January 1926 रोजी लाहोर मध्ये झाला. इथेच त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. १९४९ मध्ये कनीझ ह्या चित्रपटाला त्यांनी सर्वप्रथम संगीत दिले. आधी त्यांनी फक्त शमशाद बेगम, गीता दत्त आणि महम्मद रफी ह्यांच्या सोबत काम केले. १९५६ मध्ये CID चित्रपटात त्यांनी आशा भोसले ह्यांना रसिका पुढे आणले.

१९५० ते ६० च्या दशकांत सरकार द्वारा चालवल्या जाणार्या आकाशवाणीने "असुंस्कृत" म्हणून त्यांच्या संगीतावर बंदी घातली होती. नैयर स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहायचे. त्यांच्या निवृत्तीनंतर विविध भारतीने ६ तासांच्या दोन भागाची एक मालिका त्यांच्या मुलाखतीच्या रूपाने आणली ज्याचे नाव होते "मुझे याद सब है झरा झरा".

आपल्या कारकिर्दीच्या दरम्यान नय्यर ह्यांनी लता मंगेशकर ह्यांच्या बरोबर एकदाही काम केले नाही. टॅक्सी ड्राइवर ह्या चित्रपटाला त्यांचे संगीत होते त्यांत लता ह्यांचे इतर कडे मुद्रित केलेले एक गाणे आहे. आधी ते महम्मद रफी ह्यांच्या सोबत काम करत असत पण एकदा एका मतभेदामुळे त्यांनी रफी सोडून महेंद्र कपूर ह्यांच्या सोबत काम करणे सुरु केले.

नय्यर ह्यांनी तरुण अभिनेते अमिताभ बच्चन किंवा राजेश खन्ना ह्यांना संगीत द्यायला नकार दिला होता. अशा भोसले गीता दत्त ह्यांचे "थंडी थंडी हवा" , "ये देश है वीर जवानो का" ह्या गाण्याचे लेखन त्यांनी केले होते. त्याच गाण्यासाठी त्यांना १९५८ मध्ये फिल्म फेर पुरस्कार प्राप्त झाला होता.

"जिद्द" ह्या चित्रपटाला त्यांनी १९९४ मध्ये संगीत दिले आणि हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. हिंदी चित्रपट सृष्टीत कॉमेडियन लोकांना ३ मिनिटांचे पूर्ण गाणे देणारे नाययर हे कदाचित पहिले संगीतकार होते. ओम प्रकाश ह्या कॉमेडियन ने त्यांचे  "छुरी बने कांटा बने" (जाली नोट) गाणे गायले होते, जॉनी वॉकर ह्यांनी "ये दिल है मुश्किल जिना यहाँ" आणि "जाणे कहाँ मेरा जिगर गया जी" गायले होते. 

त्यांचे निधन २००७ साली झाले.

काही उल्लेखनीय गाणी :

- एक परदेसी मेरा दिल ले गया
- लेके पहला पहला प्यार
- आओ हुज़ूर तुमको
- एहि वो जगह है
- आईये मेहरबान
- लाखों है
- मेरी निंदो में तुम
- पुकारता चला हूँ में