Android app on Google Play

 

किल्ल्यासाठी पायी यात्रा

खिरेश्वरपासून रास्ता
रस्ता गुहांमधून जातो. बाजूलाच जुन्नर दरवाजा (जुन्नर प्रवेशाद्वार) आहे. इथून सरळ तोलार खिंडीसाठी मार्ग जातो. तोलार खिंडीपासून काही मिनिटे चालायचे, एक रॉक पैच आहे ज्याला रेलिंग (कठडा) आहे. रेलिंग नंतर पथारी प्रदेश आहे. इथून आपण ७ डोंगर आर करून आणि २-३ तासांची पदयात्रा करून हरिश्चंद्रेश्वर भगवान शंकराच्या मंदिरापर्यंत पोचतो. सूचना - या रस्त्यावर अनेक दिशादर्शक आहेत जे रस्ता सापडायला मदत करतात.
या व्यतिरिक्त इथे एक चांगला लघु मार्ग आहे. या माध्यमातून तुम्ही ७ डोंगर चढून जाण्याच्या ऐवजी एका तासात मंदिरात पोचू शकता, परंतु हा मार्ग अत्यंत घनदाट अशा जंगलातून जातो. नंतर रॉक पैच चढवा लागतो. जर तुमच्यासोबत मोठा ग्रूप असेल तर या मार्गावरून जाता येऊ शकेल. तुमच्यासमोर दोन मार्ग आहेत - एक सात डोंगरांची सैर करून जाणे आणि एकाने अतिशय दाट अरण्यातून बालेकिल्ल्यावरून खाली जाणे - या मार्गाने तुम्ही सरळ सातव्या डोंगरा पर्यंत पोचू शकता. (हे अरण्य इतके घनदाट आहे की तुम्हाला वरती आकाश दिसत नाही.)
 
बेलपाडावरून रस्ता
तिसरा रस्ता विशेषकरून पायी जाणाऱ्यांसाठी, जे साधले घाटातून जातात त्यांच्यासाठी आहे. एक माळशेज घाटातून सावरणे गावामार्गे बेलपाडा गावाला जातो. इथला मार्ग साधले घाटातून जातो. इथून सरळ एक रॉक पैच आहे जो बेलपाडा पासून साधारण १ किमी उंचावर आहे. एकूण अंतर साधारण १९ किमी आहे.

कोथळे वरून रास्ता
गडावर जाण्यासाठी कोथळे गावापासून आणखी एक रस्ता आहे, जिथून तुम्ही बस किंवा खाजगी वाहनाने जाऊ शकता. या बस संगम्नेत, अकोला किंवा कोटल वरून येतात. कोटल वरून कोथळे साठी दर तासाला बस आहे. ३ किमी दूर, कोथळे पासून तुम्ही पायी जाऊ शकता. या मार्गाने जाताना तुम्ही जंगलाच्या सौंदर्याचा आणि निसर्गसौंदर्याचा मनमुराद अनाद घेऊ शकता. या मार्गावरील तलावात असलेल्या नैसर्गिक शुद्ध पाण्याचा आस्वाद घेऊ शकता.