Get it on Google Play
Download on the App Store

रावणाचा महाल

http://i.imgur.com/HKZV3co.png

असे म्हटले जाते की लंकापती रावणाचा महाल, जिथे तो आपली पट्टराणी मंदोदरी हिच्यासोबत राहत होता, त्याचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. हा तोच महाल आहे, जो पवनपुत्र हनुमानाने लंकेसोबत जाळला होता. लंकादहन हा रावणाच्या विरुद्ध रामाचा पहिला सर्वांत मोठा रणनैतिक विजय मानता येऊ शकतो कारण महाबली हनुमानाच्या या कौशल्याने तिथले सर्व निवासी भयभीत होऊन म्हणू लागले की जर सेवक एवढा शक्तिशाली आहे तर स्वामी किती ताकदवान असेल! आणि ज्या राजाची प्रजा भयभीत होते तो अर्धी लढाई तर तिथेच हरून जातो.
गुसाई यांच्या पंक्ती पहा - ‘चलत महाधुनि गर्जेसि भारी, गर्भ स्रवही सुनि निसिचर नारी’ म्हणजेच लंकादहन केल्यावर जेव्हा हनुमान पुन्हा रामाकडे जात होते तेव्हा त्यांची गर्जना ऐकून राक्षस स्त्रियांचा गर्भपात झाला.