पार्श्वभूमी
आपणा सर्वाना माहीत आहे कीं पहिल्या जागतिक महायुद्धात व त्यापेक्षा खूपच मोठया प्रमाणावर दुसर्या युद्धात पाणबुड्या बोटीनी समुद्रावर वर्चस्व गाजवले व नाविक युद्धांमध्ये फार मोठी कामगिरी बजावली. दुसर्या युद्धात तर जर्मन व जपानी पाणबुड्यांनी दोस्त राष्ट्रांना सतावले होते. इंग्लंड-अमेरिकेच्या पाणबुड्यानीहि त्याची सव्याज परतफेड केली. युद्ध संपतांसंपतां देखील अमेरिकेचे एक प्रचंड मोठे लढाऊ जहाज ( INDIANAPOLIS) बुडाले व फार मोठी, जवळपास १००० नॉसैनिक, एवढी, जीवितहानि झाली. ती एका जपानी पाणबुडीचीच कामगिरी होती.पण आपणास माहीत नसेल कीं अमेरिकेच्या यादवी युद्धातहि पाणबुडीचा वापर दक्षिणी राज्यांकडून केला गेला होता व उत्तरेच्या पक्षाचे एक मोठे लढाऊ जहाज बुडवण्यात ती यशस्वी झाली होती. माझ्या माहितीप्रमाणे ही जगातील पहिली लढाऊ पाणबुडी होती. तिचे नाव होते H. L. Hunley. तिच्याबद्दल काही माहिती आपणासमोर ठेवत आहे.