तुझ्या सौंदर्यापुढे.
तुझ्या सौंदर्यापुढे.
चंद्राला नाही तेज
सूर्य देखील फिका पडे.
परी अप्सरा सारे शून्य
तुझ्या सौंदर्यापुढे.
*************************************************
मोती शिंपले
एवढ्या मोठ्या समुद्रात
लहान- लहान मोती शिंपले,
माझे संपूर्ण जीवन
तुझ्या प्रेमासाठी गुंफले.
*************************************************
दुःख
शिंपले तुडविण्याचे दुःख
मोत्यांवर उमटलेलं नसते,
कारण त्यांना काय ठाऊक
शिंपल्यांनी त्यांना केवढ जपलं असते.
*************************************************
दागिना
स्वार्थी वृत्तीच्या या जगात
वाहुद्या आपुलकीचा झरा.
पैसा नाही, तर प्रेम हाच
मनुष्याचा दागिना खरा.
*************************************************