Get it on Google Play
Download on the App Store

रचना

कालिदास रचित ग्रंथांचा तक्ता खूप मोठा आहे. परंतु विद्वानांचे मत असे आहे की या नावाचेक आणखी देखील कवी होऊन गेले आणि या रचना त्यांच्या असू शकतात. विक्रमादित्याच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या कालिदासाच्या ७ रचना प्रसिद्ध आहेत. यापैकी ४ काव्य ग्रंथ आहेत - रघुवंश, कुमारसंभव, मेघदूत, ऋतुसंहार. तीन नाटके आहेत


http://ecx.images-amazon.com/images/I/41-PO1IaVEL._SX258_BO1,204,203,200_.jpg


अभिज्ञान शाकुंतलम्, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय.या रचनांमुळे कालिदासाची गणना जगातील सर्वश्रेष्ठ कवी आणि नाटकाकारांमध्ये केली जाते. साहित्यासोबातच त्याच्या रचनांना ऐतिहासिक महत्व देखील आहे. संस्कृत साहित्याच्या ६ काव्य ग्रंथांची गणना सर्वोपरी करण्यात येते. त्यांच्यामध्ये एकट्या कालिदासाचे ३ ग्रंथ रघुवंश, कुमारसंभव आणि मेघदूत आहेत. त्यांना 'लघुत्रयी' नावाने देखील ओळखण्यात येते. बाकीच्या तीन भारवि कृत किरातर्जुनीय, माघ कृत शिशुपाल वध आणि श्रीहर्ष कृत नैषधीयचरित या रचनांचा समावेश आहे. याच्या व्यतिरिक्त अनेक अन्य काव्यांमध्ये देखील कालिदासाचे नाव जोडले जाते, जसे श्रृङ्गारतिलक, श्यामलादण्डक इत्यादी. ही काव्य एक तर कालिदास नावाच्या अन्य कवींनी लिहिली आहेत किंवा कोणी आपले काव्य प्रसिद्ध व्हावे म्हणून त्यासोबत कालिदासाचे नाव जोडले आहे.