Get it on Google Play
Download on the App Store

शूरसेन जनपद

http://www.freeindia.org/dynamic_includes/images/biographies/greatkings/vikramaditya.jpg

महाकवी कालिदासाला चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन मानले जाते. रघुवंश मध्ये कालिदासाने शूरसेन जनपद, मथुरा, वृन्दावन, गोवर्धन तथा यमुना यांचा उल्लेख केलेला आहे. इंदुमतीच्या स्वयंवरात विभिन्न प्रद्देशातून आलेल्या राजांसोबत त्याने शूरसेन राज्याचा अधिपती सुषेण याचे देखिल वर्णन केले आहे. मगध, अंसु, अवंती, अनूप, कलिंग आणि अयोध्या यांच्या मोठ्या राजांमध्ये शूरसेन नारेशाची गणना करण्यात आलेली आहे. कालिदासाने ज्या विशेषणांचा उपयोग शूरसेन नारेशाकरिता केला आहे त्यावरून असे लक्षात येते की तो एक प्रतापी शासक होता, त्याची कीर्ती स्वर्गातील देव देखील गात असत, आणि त्याने आपल्या शुद्ध आचरणाने आपले माता आणि पिता दोहोंच्या वंशाला प्रकाशित केले होते. त्यापुढे जाऊन सुषेण याला विधिवत यज्ञ करणारा, शांत प्रवृत्तीचा शासक म्हटलेले आहे, ज्याच्या तेजाने शत्रू घाबरून जात असत. इथे मथुरा आणि यमुनेची चर्चा करताना कालिदासाने लिहिले आहे की जेव्हा राजा सुषेण आपल्या प्रेयासिंसोबत मथुरेत यमुना-विहार करत असे तेव्हा यमुनेच्या जलाचा कृष्ण वर्ण गंगेच्या उज्ज्वल प्रवाहासारखा भासत असे. इथे मथुरेचा उल्लेख करताना कालिदासाला कदाचित काळाचे भान राहिले नसावे. इंदुमती (जिचा विवाह अयोध्या नरेश अज याच्याशी झाला) च्या काळात मथुरा नागरी नव्हती. ती तर अनेक पिढ्यांनंतर शत्रुघ्न च्या हस्ते वसवण्यात आली. टीकाकार माल्लीनाथाने या श्लोकांवर टीका करताना याच मुद्द्यावर बोट ठेवले आहे. कालिदासानेच अन्यत्र यमुनेच्या काठावर शत्रुघ्न द्वारे भव्य मथुरा नगरीच्या निर्मितीचे वर्णन केले आहे. शत्रुघ्न चे पुत्र शूरसेन आणि सुबाहु यांचे क्रमशः मथुरा आणि विदिशा चे अधिकारी होण्याचे वर्णन देखील रघुवंश मध्ये आहे.