Get it on Google Play
Download on the App Store

नकारात्मक विचार मनात उत्पन्न होताच मनातून काढून टाका


कधी कधी दुसऱ्याने माफ केले तरी आपण स्वतःला क्षमा करू शकत नाही. जरी माझे आणि माझ्या मित्रामध्ये झालेले मतभेत संपले होते तरी देखील वेळोवेळी माझ्या वागण्याबद्दल मला पश्चात्ताप होतच होता. मग हळू हळू माझ्या लक्षात आले की स्वतःला क्षमा करणे एका वेळेतच शक्य नाही, ते हळू हाकू वेळेबरोबर जमत जाते. त्यामुळे जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील, दीर्घ श्वास घेऊन त्या विचारांना त्याच वेळी मनातून काढून टाका आणि आपले लक्ष दुसरीकडे वळवा, किंवा एखादी अशी क्रिया किंवा असे काम जे तुम्हाला करायला आवडते ते करा.