Get it on Google Play
Download on the App Store

सारं समोर घडत असतानाही...

निपचित पडलेत...
हात-पैर
डोक्यातला मेंदू
आणि मन.

की,
असंवेदनशील झालेत ?
हात-पैर
डोक्यातला मेंदू
आणि मन.

सहनशिलतेच्या पलिकडले सारे...

तरीही निष्क्रिय का?
हात-पैर
डोक्यातला मेंदू
आणि मन.

माझी प्रतिक्रिया का उमटत नाही?

की मृतावस्थेत आहेत?
हात-पैर
डोक्यातला मेंदू
आणि मन.

माझी माणुसकी नामक नस तपासा कुणीतरी...
आणि बघा जरा, मी जिवंत आहे की मेलोय ते...

नामा म्हणे

नामदेव अंजना
Chapters
नामा म्हणे कविता 'ती'च्यासाठी... लोक हो... सारं समोर घडत असतानाही...