नामा म्हणे
खूप झाले बोलणे 'फेबु'वरी
राम नाही राहिला बुवा 'टिवटिवा'त
वाचून सारे रडगाणे जगाचे
उगा घालमेल ह्या जिवात ।।१।।
कमेंटां'मधुनी किती बोलशील रे
जरी मिळाला बोलण्या आवार पेशल
बोलण्याच्या बी जरा हायत लिमिटा
बोलावे तितुकेच, जितुके लोका 'सोशल' ।।२।।
'फेबु'वरी अासती 'लाईक'र्स बाई
नेमाने करीती लाईक बाई
'पोस्टी'त जुनाट इचार जरी
इचारांचे त्येच पाईक बाई ।।३।।
कोण मेला म्हणितो रिकामटेकडे आम्ही
क्रांती-परिवर्तनावरी बोलितो आम्ही
'पोस्टीं'वरील कमेंटांच्या युद्धात
तोफेसम कमेंटा झेलितो आम्ही ।।४।।
'फेबु'साठी पेसल फोटू काढूनी थकलो
फोटू काढिता-काढिता लाजूनी थकलो
'लायकां'मागुनी लायका येती अशा की
फोटूची लायका मोजूनी थकलो ।।५।।
राम नाही राहिला बुवा 'टिवटिवा'त
वाचून सारे रडगाणे जगाचे
उगा घालमेल ह्या जिवात ।।१।।
कमेंटां'मधुनी किती बोलशील रे
जरी मिळाला बोलण्या आवार पेशल
बोलण्याच्या बी जरा हायत लिमिटा
बोलावे तितुकेच, जितुके लोका 'सोशल' ।।२।।
'फेबु'वरी अासती 'लाईक'र्स बाई
नेमाने करीती लाईक बाई
'पोस्टी'त जुनाट इचार जरी
इचारांचे त्येच पाईक बाई ।।३।।
कोण मेला म्हणितो रिकामटेकडे आम्ही
क्रांती-परिवर्तनावरी बोलितो आम्ही
'पोस्टीं'वरील कमेंटांच्या युद्धात
तोफेसम कमेंटा झेलितो आम्ही ।।४।।
'फेबु'साठी पेसल फोटू काढूनी थकलो
फोटू काढिता-काढिता लाजूनी थकलो
'लायकां'मागुनी लायका येती अशा की
फोटूची लायका मोजूनी थकलो ।।५।।