Android app on Google Play

 

पंचानन गणेश

 

भंडारा जिल्ह्यातील पवनीचा पंचानन गणेश हा ही एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टविनायकांपैकी एक आहे. पंचानन गणेश असला तरी पाच मुखांची एकच मूर्ती असे या मुर्तीचे स्वरूप नाही तर या पाच वेगवेगळ्या मूर्ती एकमेकींच्या पाठीला पाठ टेकवून बसल्या आहेत. चार दिशांना चार आणि पाचवे नैऋत्य दिशेला तोंड करुन बसलेल्या या मुर्तींना एकत्रितपणे पंचानन गणेश म्हणतात.

या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मूर्ती दगडी नाहीत तर त्या शमीच्या लाकडावर कोरलेल्या रेखीव मूर्ती आहेत. पवनी हे गाव पुरातन काळापासून बौद्ध आणि हिंदू धर्मीयांसाठी उपासनेचे केंद्र राहिले आहे. असंख्य पुरातन मंदिरे हे पवनीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

असे हे विदर्भाच्या आठ दिशांना असलेले अष्टविनायक. बहुतेक मंदिरांना निसर्गसुंदर परिसर लाभला आहे. त्यामुळे एकदा या मंदिरांना भेट दिलीच पाहिजे अशी ही गणपतीस्थाने आहेत.