भारताची आण्विक क्षेत्रातील भरारी
भारताने CIRUS च्याच डिझाइन वर आधारित असा दुसरा मोठा रिअॅक्टर, ध्रुव नावाचा, BARC येथेच बांधला. हे काम भारतीय तंत्रज्ञ/शास्त्रज्ञांनीच पार पाडले. हाहि research reactor आहे. यातील fuel rods पासून भारताला weapons grade प्लुटोनिअम मिळते व स्वत: बनवलेला असल्याने त्यावर परकीय नियंत्रण नाही. power reactors मधील fuel rods मधून मिळणार्या प्लुटोनिअमचा वापर करण्यावर काही बंधने आहेत. अणुबॉंब बनवण्यासाठी त्याचा वापर करतां येत नाहीं.रिअॅक्टर्स मध्ये fuel rods सारखेच महत्व moderators and coolers या दोन घटकांना असते. moderators चे काम चेन रिअॅक्शन वर ताबा ठेवण्याचे व coolers चे काम core मध्ये निर्माण होणारी ऊष्णता काढून घेणे हे असते. ही काढून घेतलेली ऊष्णता power-reactors मध्ये विद्युतनिर्मितीसाठी वापरली जाते. moderators मध्ये heavy water हे महत्वाचे आहे. भारताने याही बाबतीत स्वायत्तता मिळवलेली आहे. Natural Gas मध्ये किंचित प्रमाणात heavy hydrogen असतो तो वेगळा करणे हेहि एक किचकट व खर्चिक काम आहे. भारताला Bombay High मधून natural gas मिळू लागला त्याच्या वापरातून थळ-वायशेत येथे मोठा खत प्रकल्प बांधला गेला. तीच gas pipeline थोडी पुढे नेऊन गॅसपासून heavy water बनवण्याचा कारखाना उभा राहिला. त्याच्याशीहि माझा थोडा संबंध आला. नंतर असा कारखाना कोटा येथेहि झाला. तारापुर नंतर कोटा, कल्पकम, कारवार, नरोडा अशा इतर ठिकाणीहि अनेक power reactors बांधले गेले आहेत व आणखी अनेक बांधले जात आहेत वा योजले आहेत. या रिअॅक्टर्स मध्ये नैसर्गिक युरेनिअम आणि प्लुटोनिअम पासून बनलेले fuel rods वापरले जातात आणि pressurised heavy water चा moderator/cooler म्हणून वापर होतो. या दोन्ही बाबतींत भारत स्वयंपूर्ण आहे. मात्र Nuclear Power Reactors च्या fuel rods साठी काही प्रमाणात आयातीवर अवलंबून रहावे लागते. जैतापुर येथे असेच रिअॅक्टर योजलेले आहेत व त्यावरून वादंग सुरू आहे.