तारापूर
भारताने पाठोपाठ power reactors हि बांधण्यास तारापुर येथे सुरवात केली. हा वेळ पर्यंत अमेरिका भारतविरोधी नव्हती. तारापुरला अमेरिकन कंपनीनेच मुख्य काम केले. power reactors मधील fuel rods मधील U238 चेहि pu239 - pu240 या प्लुटोनिअम Isotopes मध्ये रूपांतर होतेच. fuel rods थोडाच काळ - ४-५ महिने रिअॅक्टरमध्ये वापरलेले असले तर pu240 थोडा व pu239 जास्त असतो. fuel rod मधील युरेनिअम संपेपर्यंत तो वापरला गेला तर pu240 जास्त प्रमाणात बनतो. त्याचा वापर करतां येत नाहीं. तारापुर येथील पॉवर रिअॅक्टर्सचे डिझाइन असे आहे कीं रिअॅक्टर पूर्णपणे बंद न करतांहि त्यांतील काही fuel rods बदलतां येतात त्यामुळे तसे ते काढले म्हणजे pu239-pu240 मिळवतां येते. त्यामुळे तेथेहि भारताने प्लुटोनिअम प्लॅंट बांधले. यामुळे पुढील रिअॅक्टर्ससाठी भारताला स्वत:चे प्लुटोनिअम मिळू लागले. तसेच प्लुटोनिअम बॉंबसाठीहि! हेच पुढील वादांचे मूळ आहे.