Get it on Google Play
Download on the App Store

संयमी गोळी


एकदा जेव्हा एका माणसाच्या बहिणीने प्रेमात फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या केली तेव्हा त्या माणसाने तिचा प्रेमी हेनरी जीग्लैंड वर सूड उगवण्याचा निश्चय केला. त्याने हेनरी जीग्लैंड वर गोळी झाडली पण त्याचा नेम चुकला आणि ती गोळी एका झाडाला लागली. त्यानंतर त्या भावाने स्वतःला देखील गोळी मारून घेतली. जवळ जवळ २० वर्षांनंतर हेनरी जीग्लैंड त्या जागेची सफाई करत असताना त्याने ते झाड तोडण्यासाठी डायनामाईट चा वापर केला. त्या स्फोटात झाडात रुतून बसलेली ती गोळी इतक्या जोराने बाहेर आली कि ती हेनरी जीग्लैंडच्या डोक्यात घुसली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.