Android app on Google Play

 

चित्रपट-बाळकडू

 


२०१५ या वर्षात बाळकडू नावाचा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला जो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्श विचारांपासून प्रेरित तरुणाच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. या सिनेमाच्या निर्माती स्वप्ना पाटकर आहेत आणि दिग्दर्शक आहेत अतुल काळे. या सिनेमातील तरुणाची भूमिका उमेश कामत या मराठी अभिनेत्याने साकारली आहे. ह्या सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरण्यात आला आहे. २३ जानेवारी रोजी म्हणजेच त्यांच्या जयंतीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करून त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली.