Android app on Google Play

 

१९९०-२०१५

 

१९९२ साली ए.आर.रेहामानसारखा उत्कृष्ट कलाकार जगासमोर आला. "रोजा" मधल्या त्याच्या संगीताने चित्रपट संगीताचा कायापालट केला. त्यानंतर आला वादग्रस्त "बॉम्बे" ज्यात मुंबई दंगलीन्दरम्याने एक हिंदू मुलगा एका मुसलमान मुलीच्या प्रेमात पडतो. त्यातल्या ए.आर.रेहमानच्या 'केहेना हि क्या'ने अनेक महिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या काळात अमिताभ सक्रीय नसताना अनेक उत्कृष्ट कलाकार उदयाला आले. संजय दत्तने १९९३ मध्ये "खलनायक" केला. खलनायक असो, रोजा असो, बॉलिवूडला एक असा विषय मिळाला होता जो प्रेक्षकांना आवडला, तो म्हणजे अंडरवर्ल्ड आणि आतंकवाद.

आमीर, शाहरुख आणि सलमान हे तीन खान चित्रपट जगतावर राज्य करत होते. माधुरी दीक्षितला मधुबालाचा दुर्मिळ दर्जा मिळाला होता. १९९५ मध्ये आलेला "रंगीला" विशेष लोकप्रिय झाला तो उर्मिला मतोंडकरच्या अभिनयामुळे. रंगीलाच्या संगीताने ए.आर.रेहमानचे वेगळेपण पुन्हा सिद्ध केले.

राम गोपाल वर्मा नेहमीच नव्या, चांगल्या अभिनेत्याच्या शोधात असतो. "सत्या" मधल्या भिकू म्हात्रेच्या स्वरुपात त्याने चित्रपट सृष्टीला मनोज वाजपेयीसारखा उत्कृष्ट कलाकार मिळवून दिला. याच सुमारास असं दिसून आलं की शाहरुख खान अमिताभची जागा घेऊ पाहतोय... कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कारण-अर्जुन नंतर त्याला बच्चनचा उत्तराधिकारी मानलं जाऊ लागलं. अमिताभने "लाल बादशाह"करवी पुनरागमनाचा एक अयशस्वी प्रयत्न केला. त्याची कंपनी अस्तित्वात आल्यावर काही काळातच दिवाळखोरीला आली. अशातच २००१ मध्ये त्याला एक टीव्ही सिरीयल (कौन बनेगा करोडपती) मिळाली ज्यामुळे तो पुन्हा पूर्वीच्या स्थानावर पोहचू शकला. आज वयाच्या सत्तरीनंतरही अमिताभ चित्रपट सृष्टीतील सर्वात लाडके आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे.

सन १९९९ला विशेष ओळखलं जातं ते "कहो न प्यार है" सिनेमामुळे. भारतीय तरुणींना हृतिक रोशनच्या रूपाने देशी टोम क्रुज मिळाला. प्रत्येकजण त्याच्याबरोबर काम करू इच्छीत होता. यक चित्रपटाचे दिग्दर्शक त्याचे वडील राकेश रोशन तर संगीतकार काका राजेश रोशन होते. अमिताभचे चिरंजीवही पुनरागमनाच्या प्रयत्नात होते. त्याचा पाहिला सिनेमा "रेफ्युजी" चांगला असूनही चालला नाही. अभिषेकला खूप प्रातीक्षेनंतर २००४ मध्ये "युवा" आणि "धूम"करवी पाहिलं यश प्राप्त झालं. युवासाठी त्याला पुरस्कारही मिळाला.

२००२ मध्ये आमीर खानचा "लगान" आणि सन्नी देओलचा "गदर" प्रदर्शित झाले. या दोन चित्रपटांनी बाकी कोणता चित्रपट चालूच दिला नाही. लगानला अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन होते पण पुरस्कार मिळाला नाही. त्यातले ए.आर.रेहमानचं संगीत आजही भुरळ घालते. गदर इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपटांच्या यादीत जाऊन बसला. या चित्रपटातून सन्नी देओल आणि अमिषा पटेलने चित्रपट सृष्टीत पुनरागमन केलं. वयात १५ वर्षाचं अंतर असूनही त्यांची जोडी लोकांना भावली.

याव्यतिरिक्त लता मंगेशकर, मदन मोहन, पंचमदा, आशा भोसले यांनी चित्रपट सृष्टीच्या या प्रवासात महत्त्वाचे योगदान दिले.