Get it on Google Play
Download on the App Store

१९७०-८०


या दशकाच्या सुरुवातीला केवळ एकच नाव गाजत होतं, राजेश खन्ना! परंतु १९७५च्या दरम्यान अमिताभ बच्चनच्या आगमनाने सगळी परिस्थिती बदलून गेली. किशोर कुमार राजेश खन्नाचा आवाज बनला. १९७३ मध्ये एका युवकाची प्रेमकहाणी "बॉबी" आला. बिकिनी घातलेल्या १७ वर्षीय डिम्पलने या चित्रपटाला खूप लोकप्रियता मिळवून दिली. हा चित्रपट पुढे अनेक वर्ष अनेक ठिकाणी प्रदर्शित झाला. पुढील वर्षी श्याम बेनेगलने कला, सिनेमा क्षेत्रांत आपले स्थान पक्के केले. नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, सचिन, अमोल पालेकर यांसारख्या कलाकारांना त्यांनीच चित्रपट सृष्टीत प्रवेश मिळवून दिला.

 

भारतीय चित्रपटाच्या इतिहासात १९७५ हे वर्ष कधीही विसरता येणार नाही. "शोले" हिंदी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. त्यातील प्रत्येक संवाद लक्षात राहणारा आहे. सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट संगीत, आणि विशेषकरून संवादांनी शोलेला रमेश सिप्पीचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट बनवला.

 

१९७६ मध्ये इंदिरा गांधींच्या राजवटीत देशात आणीबाणीची घोषणा झाली. चित्रपट बनण्याचं प्रमाण कमी झालं. पण १९७७ मध्ये नवे सरकार बनल्यावर प्रथमच एका 'लो बजेट' चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. सत्यजित रें चा "शतरंज के खिलाडी" प्रेमचंदांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट होता. १९७८ मध्ये चित्रपटात शरीर प्रदर्शनाला सुरुवात झाली. "सत्यम शिवम सुंदरम" मध्ये झीनत अमानने हि भूमिका साकारली होती. आणि तो चित्रपट वादग्रस्तही ठरला.

 

याच वर्षी आलेल्या "काला पत्थर" मध्ये अनेक उत्तम कलाकार होते. त्याचबरोबर चित्रपटात सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला होता. यश चोपडा यांचा अमिताभ बरोबर हा ४था चित्रपट होता. १९७९ मध्ये नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, स्मिता पाटील आणि अमरिश पुरीसारखे कलाकार असलेला "आक्रोश" आला, या चित्रपटाद्वारे गोविंद निहलानी यांनी स्वतःला एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सिद्ध केले. चित्रपट जास्त चालला नाही, पण त्यातील अभिनय आणि दिग्दर्शनाचे कौतुक झाले.

 

१९८२ मध्ये रिचर्ड एटनबरो च्या रुपाने गांधीजी सजीव स्वरुपात समोर आले. या चित्रपटाला ६ अकादमी पुरस्कार मिळाले आणि आतापर्यंत सर्वात जास्ती (३०,०००) एक्स्ट्रॉ कलाकार वापरल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये चित्रपटाची नोंद झाली. १९८३ मध्ये भारताने क्रिकेट विश्वकप जिंकल्यामुळे कपिल देव आणि टीम ची मागणी वाढली. त्यामुळे कोणतेही गुंतवणूकदार फार पैसे कमवू शकले नाहीत.

 

८० च्या दशकाचा अमिताभ अनभिषिक्त सम्राट होता. राजेश खन्नाही त्याला मागे टाकू शकला नाही. १९८७ मध्ये विनीद खन्नाने "इन्साफ" आणि "सत्यमेव जयते" सारख्या चित्रपटांनी चित्रपट सृष्टी गाजवली. पण काही लोकांसाठी ८० चं दशक हे टीव्ही इंडस्ट्री उदयाला येण्याचा काळ होता. रामायण आणि महाभारत मालिका १९८७ मध्ये सुरु झाल्या आणि १९८८-८९ ला संपल्या. देशभरात ९०% टीव्हीवर हे कार्यक्रम बघण्यात येत होते. नितीश भारद्वाज कृष्णाच्या भूमिकेत शोभून दिसला. त्यानंतर एकापाठोपाठ हम लोग, वागले की दुनिया, बुनियाद, ये जो है जिंदगी, मिट्टी के रंग, नीम का पेड अशा मालिका आल्या. त्यांच्या कथा आणि अभिनय भारतीय संस्कृती आणि समाजजीवनाला अनुसरून असत. याच वर्षी परप्रांतीयांचा चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. इंग्लंडच्या मीरा नायरने "सलाम बॉम्बे" बनवला त्याला कैनस मध्ये गोल्डन कॅमेरा पुरस्कार मिळाला.

 

१९८९ पर्यंत मध्यम वर्ग एक्शन हिरोंच्या चित्रपटात बुडाला होता परंतु मध्यमवर्गीय दूरदर्शन मालिकांमध्ये बदल होत होता. मध्यम वर्ग संधिसाधू बनत होता आणि त्या गोष्टी वर्ज्य होत्या त्यांबद्दल चर्चा होऊ लागली होती. विवाहबाह्य संबंध आणि यौन संबंधांवर खुलेआम चर्चा होऊ लागली. डिम्पल कपाडिया आणि शेखर कपूरच्या "दृष्टी" मधून विवाहबाह्य संबंधाचं वास्तववादी चित्र समोर आल.