बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य
बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की, सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मानले. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते. ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते, त्यांची निर्मिती करते, मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते. ज्या बाबींकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार.
- डॉ. भीमराव आंबेडकर (बुद्ध आणि त्याचा धम्म मधून)
धन्यवाद- सुचिता खडसे (वर्धा)